पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
इस्लाम आणि संस्कृति


थकल्यामुळे एक पाऊलही पुढे टाकण्यास असमर्थ बनलेल्या गुलामांच्या अंगावर कोरडे ओढ़न पुढे चलण्यास उत्तेजन (?) देई. भोंवळ येऊन एकादा दुर्दैवी खाली पडलाच तर त्याची चामडी निघेपर्यंत व तो मतप्राय होईपर्यंत कोरडे उडविले जात.
 अशा हृदयविदारक व अमानुष प्रथेला पायबंद घालण्याचे पुण्य कार्य इस्लामनें केले आहे. गुलामगिरीचे हे विष जनतेच्या हाडीमांसी आणि रोमरोमांत इतकें भिनले होते की, नुसत्या कायद्याने त्याचे उच्चाटण करणे केव्हाही शक्य नव्हते. कायद्यामुळे फार तर वरवर गुलामगिरी नष्ट झाल्यासारखे दिसेल; पण जनतेच्या अंतर्यामी ता मळमळ कायम राहणारच, जोपर्यंत मालक व गुलाम यांच्या मनावृत्तींत कांहींच फरक झाला नाही तोपर्यंत मालक गुलामांना सदर दलितच समजणार आणि गुलामांमध्येही न्यूनगंड कायम राहणार. आज आपण अमेरिकेमध्ये काय पाहतों ? तेथे कायदा आहे पण लोकांच्या मनोवृत्तींत कांहीं बदल झाला आहे का ! अद्याप नीग्रोना बहिष्कृत समजण्यांत येते, त्यांना छळण्यांत येतें: कित्येक वळा त्यांना उभे जाळण्यांत येते. आपण आणि नीग्रो यांच्यामधील उच्चनीच भाव नैसर्गिक आहे अशी त्यांच्या मनाची ठेवण आहे. हा ठेवण बदलल्याखेरीज गुलामगिरी नष्ट झाली असें आपणांस म्हणता येईल काय ?

 गुलामगिरीस खतपाणी घालणारी मनोवृत्तीच नष्ट करणे हा एकच उपाय शक्य आहे आणि तो इस्लामने यशस्वी रीतीन हाताळला आहे. गुलाम आपल्यासारखीच माणसे आहेत, त्यांनाही


Spirit of Islam, Page 405.