पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

८५


च त्यांचा नोकर आळीपाळीने उंटावर बसत. ते जेरूसलेमजवळ - . आले त्या वेळी उंटावर बसण्याची नोकराची पाळी होती. सर-सेनापतीने नोकराला खाली उतरवून आपण उंटावर आरूढ व्हावें व नंतर शहरांत प्रवेश करावा असें हजरत उमरनां परोपरीने विनविलें. हजरत उमरनी त्याच्या विनंतीस साफ नकार दिला. ते म्हणाले, “ इस्लाममध्ये अमीर व गरीब असा भेद नाही हे तुला माहित नाही का ? तूं मुस्लिम असून अशी मला विनंति. करावीस याचे मला आश्चर्य वाटते.” हजरत उमरनी आणखी चार शब्द ऐकविले व तडक शहरांत प्रवेश केला.
 आणखी एका प्रसंगी कुरेशांचा प्रमुख सरदार अबू सुफीयान हजरत उमर यांना भेटावयास आला होता. पूर्वी गुलाम असलेले तिघे गृहस्थ अगोदरच हजरत उमर यांची मुलाखत घेण्याकरितां येऊन बसले होते. भेटीची वेळ होतांच हजरत उमरनी प्रथम त्या गुलामांची भेट घेतांच सरदार अबू सुफीयान संतप्त झाला. जवळच्या लोकांनी त्याला समजावलें की इस्लाममध्ये बडा छोटा असा भेदभाव नाही. तुमच्या अगोदर ते तिघेजण आल्यामुळे त्यांची प्रथम भेट घेणे हे हजरत उमर यांचे कर्तव्यच होतें. ते त्यांनी केले म्हणन तुम्ही त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत.
अब उबेदा या पराक्रमी सेनापतीने कादीसियाची लढाई जिंकल्यानंतर पर्शियन नागरिकांनी त्याला भेट म्हणून पंचपक्वान्नांनी भरलेली ताटे पाठवून दिली. त्यांनी विचारले की हे माझ्याकरितां . आहे की सर्व सैन्याकरितां ? त्यांनी उत्तर दिले, “ आम्हांला भरपूर वेळ न मिळाल्यामुळे फक्त आपल्याकरितांच ही पक्वान्ने तयार