पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
इस्लाम आणि समाजशास्त्र


दरवाजा सर्वांना सताड उघडा असे. मोठया माणसांना प्रथम आणि नंतर सवड असल्यास गरिबांना प्रवेश असें कधीच घडत नसे. धर्मप्रणेते म्हणून ते अग्रभागी कधीच बसत नसत किंवा सर्वाधिकारी म्हणन मस्खमलीचे आसन स्वीकारीत नसत. मशिदींत प्रार्थनेच्या वेळी देखील तसेंच आचरण असे. अरबस्तानच्या प्रखर उन्हांत ते अनवाणी चालत. आपण एका राज्याचे धनी म्हणन पालखीतून जावे किंवा आपल्यावर छत्रचामरें ढाळावी असे त्यांना कधीच वाटल नाही. हजरत पैगंबरांची ही उज्ज्वल शिकवण मुस्लिमांनी आजतागायत अंमलांत आणली आहे. मशिदीत प्रार्थना करीत असता अमीराच्या शेजारी गरीब उभा असलेला दिसेल किंवा भोजन करीत असतां श्रीमंत व मजूर, मालक व नोकर एकाच ताटांत जेवताना दिसतील किंवा एकाद्या समारंभाच्या ठिकाणी मोठा अधिकारी व चपराशी शेजारी बसलेले आढळतील.
 हजरत पैगंबरांची समतेची शिकवण त्यांच्यानंतर होऊन गेलेल्या खलिफांनी व राज्यकर्त्यांनी कशी तंतोतंत पाळली याची असंख्य उदाहरणे आपणांस इस्लामच्या इतिहासांत आढळतील.त्यापका खालील कांही उदाहरणे मनन करण्यासारखी आहेत. खलिफा हजरत उमर हे मदिनेहून जेरूसलेमला तहाच्या वाटाघाटी करण्याकरितां निघाले असता त्यांनी आपल्या बरोबर फक्त एक नोकर घेतला होता. उंटावरून मजल दरमजल करीत ते जेरूसलेमच्या वेशीजवळ पोहोचले. त्या वेळी त्यांचे स्वागत करण्याकरितां, वेशीजवळ त्यांचा सरसेनापती हजर होता. हजरत उमर उंटाची दोरी धरून पायी चालत असून त्यांचा नोकर उंटावर बसलेला पाहून तो सरसेनापति चकित झाला. एकच उंट असल्यामुळे हजरत उमर