पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
इस्लाम आणि संस्कृति


करण्यांत आली आहेत ! " अबु उबैदा म्हणाला, “मी आणि माझे सैनिक यांच्यामध्ये भेदभाव मी कधीच मानीत नाही. माझ्या सैनिकांना सोडून आपल्या पंचपक्वान्नांचा आस्वाद मी घेऊ शकत नाही. आम्ही सर्व समान आहोत अशी अल्लाची आज्ञा आहे."
 डॉ. इक्बाल यांनी आपल्या 'असरारे खुदी' या काव्यग्रंथात इस्लामची समता केवढ्या श्रेष्ठ दर्जाची आहे याचे अत्यंत हृदयंगम वर्णन केले आहे. त्यामध्ये एका राजाची कथा देण्यांत आली आह. त्या राजाकरितां एका कारागिराने अत्यंत संदर व अवर्णनीय असा प्रासाद तयार केला. अशी नयनमनोहर कृति पुन्हां त्या कारागिरान दुसऱ्या एकाद्या राजाकरितां तयार केल्यास आपल्या प्रासादाच वैशिष्टय जाईल म्हणन त्याने त्या कारागिराचे हात तोडण्याचा हुकूम दिला. हुकमाची अंमलबजावणी झाल्यानंतर, आपला रक्ताळ. लेला हात घेऊन तो कारागिर थेट न्यायाधिशाकडे गेला व त्यान आपल्यावर झालेला अन्याय निवेदन करून राजाविरुद्ध आपला फिर्याद दाखल केली. न्यायाधिशाने ती फिर्याद स्वीकारली व आपल्यापुढे हजर होण्यास त्या राजास फर्माविले. त्याप्रमाणे राजा. न्यायालयांत हजर झाला व त्याने आपला गुन्हा कबूल कला. आपला हात उघडा करून त्या राजाने तीच शिक्षा आपणास करावी अशी न्यायाधिशास विनंति केली. आपल्यास न्याय मिळाला असें फिर्यादीने सांगितल्यावर तो प्रश्न निकालांत निघाला. डा. इक्बाल यांनी वरील घटनेचा खालील शब्दांत समारोप केला आहे.
 " पेशी कुरआन बंदा वो मौला याकस्त बोर्या वो मसनदा दीबा याकस्त." ( कुराणचे दृष्टीने धनी व गुलाम सारखेच आहेत; गोधडी व मखमलीचे सिंहासन यांमध्ये कांहींच फरक नाही.)