पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

८३


स्नेह हा शब्दच समतावाचक आहे. स्नेह्यांमध्ये भेदभाव, उच्चकनिष्ठ यांना कधीही अवसर असत नाही. स्त्रीपुरुष परस्परांचे स्नेही आहेत याचा अर्थ त्यांच्यामध्ये समता आहे असें इस्लाम मानतो.
 हजरत पैगंबरांनी आपल्या आचारविचारांनी मुस्लिमांस समतेचा फार मोठा धडा घालून दिला आहे. 'समतेचा मूर्तिमंत आदर्श' . अशा शब्दांत परधर्मीयांनी हजरत पैगंबरांना गौरविले आहे. सर्व-' साधारण नागरिक असतां त्यांच्या समतेच्या ज्या कल्पना होत्या, त्यांमध्ये ते मदिनेचे सर्वाधिकारी झाल्यानंतर काडीमात्र बदल झाला नाही. राजसत्ता हाती आल्यानंतरही ते पूर्वीप्रमाणेच गोरगरीब, मजर व शेतकरी यांच्याशी समतेने वागत. रस्त्यावरून जाणाऱ्या वद्ध अगर अशक्त नागरिकांच्या डोक्यावरील बोजा आपल्या डोक्यावर घेऊन जाणे हा त्यांचा नि-याचाच क्रम होता. मशिदीचे बांधकाम चालले असतां, थकून गेलेल्या मजूराच्या डोक्यावरील दगड त्यांनी स्वतः वाहून त्या मजूराला विसावा दिला. मोलमजूरी करणाऱ्या मजूरांबद्दल त्यांना विलक्षण जिव्हाळा वाटे. ते आजारी पडल्यास ते स्वतः त्यांच्या घरी जाऊन शुश्रपा करीत. “ मजूर म्हणजे क्षुल्लक मनुष्य नसून तो परमेश्वराचा स्नेही आहे" असें हजरत पैगंबर म्हणत. मजुरांशी स्नेह राखणे म्हणजे परमेश्वराशी स्नेह जोडणे' अशी त्यांची भावना होती. ' मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजूरी देऊन टाका' अशी घोषणा करून हजरत पैगंबरांनी मजूर व श्रमीक यांच्याबद्दलची कळकळ व्यक्त केली आहे. त्यांच्याजवळ गरीब श्रीमंत हा भेद नव्हता हे आपण पाहिले आहे. गरीबांशी बातचीत करीत अमतां, एकादा श्रीमान गृहस्थ आला तर त्या गरीबाकडे दुर्लक्ष्य करून त्या श्रीमानाची ते कधीच वास्तपूस्त करीत नसत. त्यांचा