पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
इस्लाम आणि संस्कृति


उच्चनीच नाही. परमेश्वराजवळ श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव नाही. एकाद्या गरीब किंवा अशिक्षित गृहस्थास दूर लोटणे, त्याच्याकडे तुच्छतेने पाहणे हा अधर्म आहे. हजरत पैगंबरांच्या भोंवतीं सदैव मजूर, गरीब यांचा घोळका असे. मक्केमधील धनवान आणि कुलश्रेष्ठ समजले जाणारे कुरेश हजरत पैगंबरांना म्हणाले, “ आपण या गरीब व दलितांची सोबत सोडीत असाल तर आम्ही इस्लाम धर्म स्वीकारतो.” हजरत पैगंबरांनी या मागणीस साफ नकार दिला. समता हे इस्लाममधील महत्त्वाचे तत्त्व आहे. या तत्त्वास हरताळ फांसला तर इस्लाम धर्म राहिलाच कोठे ? तमच्यासारख्या लोकांचे इस्लाम धर्मास पाठवळ मिळत आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे; पण त्याकरितां समतेचे तत्त्व लाथाडून या गरीब व दलित लोकांना मा कधीही दूर लोटणार नाही असा हजरत पैगंबरांनी कुरेशांना खडखडीत जबाब दिला.

" मुस्लिम स्त्रीपुरुष परस्परांचे स्नेही आहेत."


-हजरत मुहम्मद पैगंबर


 स्त्रीपुरुष यांमध्ये समता असणे क्रमप्राप्त आहे. आपण स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आपणांस त्यांच्यापेक्षा जादा अधिकार आहेत, स्त्रियाचर सत्ता गाजविण्याचा अधिकार निसर्गाने आम्हांला दिला आहे अशा चल्गना पुरुष जातीने कधीही करूं नयेत. इस्लाम स्त्री-पुरुष यांमध्ये भद मानीत नाही. स्त्री ही गुलाम नसून ती माणसाची कर्तत्त्वशक्ति आह असें तो समजतो. स्त्री बटीक नसून ती घरची राज्ञी आहे. स्त्रियांना समान दर्जा मिळावा म्हणन त्यांना पुरुषांच्या दासी किंवा बटाक म्हणून न लेखतां इस्लामनें त्यांना स्नेही म्हणून पुकारले आहे.