पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

८१


समता ही धर्माज्ञा समजून तिचा अवलंब केला पाहिजे असा पवित्र कुराणचा आदेश आहे.

मी आपल्यासारखाच एक माणूस आहे."


-पवित्र कुराण १८:११०.


 वरील वाक्य हजरत मुहम्मद पैगंबरांना अनुलक्षून आहे. हजरत पैगंबर हे इस्लाम धर्माचे प्रणेते आहेत, त्यामुळे त्यांनीच समतेची भूमिका पत्करणे हे इस्लामला जास्त श्रेयस्कर वाटते. धर्मसंस्थापक किंवा प्रणेता म्हणजे परमेश्वराचा अवतार मानला जातो. सर्वांत श्रेष्ठ असें त्याला संबोधिले जाते. त्याची पूजाअर्चा करण्यांत येते. सर्बसाधारण मनुष्यापेक्षा सर्व दृष्टीने त्याच्यामध्ये विभूतीमत्व आहे असा पुकारा केला जातो. अशा अतिरंजित कल्पनांशी इस्लाम मुळींच सहमत नाही. या कल्पना समतेचा संक्षेप करणाऱ्या आहेत असें त्याला वाटते. मानव कितीही योग्यतेचा असला तरी त्याच्यामध्ये व इतर मानवांमध्ये भेदभाव करणे इस्लामला इष्ट वाटत नाही. समतेचें तत्त्व गढ़ळ होईल अशी कोणतीही कल्पना इस्लाम पत्करत नाही. हजरत पैगंबरांची योग्यता केवढी श्रेष्ठ, त्यांचे कार्य केवढे उज्ज्वल, त्यांचे ध्येय केवढें उदात्त पण पवित्र कुराणमधील वरील वाक्यांवरून इस्लाममध्ये समतेचा पुरस्कार किती प्रकर्षाने करण्यांत आला आहे याची वाचकांस कल्पना येईल.

" लोकांना दूर लोटूं नका."


--पवित्र कुराण ६:५२


 आपण श्रीमंत आहोत, खानदानी आहोत, विद्वान आहोत या भ्रमांत गरिबांना दूर लोटणे हा अन्याय आहे. या जगामध्ये कोणीही

इ.सं.६