पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

७९


दिसून येतील. त्यावेळी हजरत पैगंबर म्हणाले, "........जगांत शांती प्रस्थापित करणाऱ्या इस्लाम धर्माचे तुम्हीं अनुयायी आहांत हे लक्षात ठेवून सर्व लोकांशी प्रेमाने वागा. दुसऱ्याच्या अंतःकरणांत प्रेम उत्पन्न होईल अशा त-हेचे वर्तन ठेवा. रक्तपात किंवा अनाचार करून तुमचा केव्हाही उद्धार होणार नाही. तुमचा कट्टा शत्र असला तरी त्याच्याशी प्रेमाने वागा. प्रेम हे आपल्या धर्मातील महान तत्त्व आहे. अंतःकरणांत द्वेषबुद्धीला थारा देऊ नका. द्वेषाने तुमच्या इतर चांगल्या भावना देखील गढळ होऊन जातील. अन्यायाची कोणतीही गोष्ट करूं नका. एकमेकांचे जीवित आणि संपत्ति एकमेकांनी पवित्र मानली पाहिजे. अतिक्रमण करूं नका. दुस-याच्या विश्वासास पात्र व्हा. व्याज व रक्ताचा बदला घेण्यास मनाई आहे. स्त्रियांचा मान राखा. स्त्रियांची तुमच्यावर व तुमची स्त्रियांवर सत्ता आहे हे विसरूं नका. आपल्या स्त्रियांवर प्रेम करा आणि त्यांना दयाळूपणाने वागवा. स्त्रियांची इज्जत राखा व तुमच्या प्रत्येक. कार्यांत त्यांना सहभागी करा. तुमच्या नोकरचाकरांशी प्रेमाने वागा. तम्ही खाल तें अन्न आणि वापराल तें वस्त्रप्रावरण त्यांना द्या. त्यांच्या शक्तिबाहेरचे काम करण्यास त्यांना सांगं नका. तुमच्या सर्व कृत्यांचा जबाब शेवटच्या दिवशी परमेश्वर तुम्हांला विचारील हे लक्षात ठेवून कोणताही अनाचार करूं नका."
 या संदेशांतील बंधुता, समता, सदाचार आणि प्रेम या चतु:- सत्रीवर इस्लामने समाज संस्थेची उभारणी केली आहे. त्या काळी अरबस्तानमध्ये सामुदायिक जीवन अस्ति वांत नव्हतेच. तेथील लोक 10 टोळ्या टोळ्यांनी रहात. एकमेकांशी सहकार्य करणे किंवा उपयोगी । पडणे त्यांना माहित नव्हते. एका टोळीने दुसऱ्या टोळीवर हल्ला