पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ४ थे
इस्लाम आणि समाजशास्त्र



 " इस्लाम म्हणजे इतिहासाचे फल व मानव प्रगतीचे एक साधन होय. नव्या सामाजिक संबंधांचे ध्येयरूपाने त्याचा उदय झाला आणि त्याच्या योगाने मानवी मनोविकासांत क्रांति करून टाकली...सामाजिक क्रांतीची नवीं साधनें निर्माण करण्याला त्याने मदत केली."

_भाई मानवेंद्र राय


 मानवी जीवन परिपूर्ण करण्यासाठी समाजसंस्थेची अत्यंत आवश्यकता आहे असें इस्लाम मानतो. मनुष्याच्या व्यक्तित्वाची वाढ व संगोपन समाज करू शकतो. समाजाशी फटकून वागणाऱ्या मनुष्याच्या व्यक्तित्वाचा विकास होणे शक्य नाही. आपण सुखी व्हावें, आपला उत्कर्ष व्हावा, आपण संस्कृतिसंपन्न व्हावे असे त्याला वाटत असेल तर त्याने समाजांत येऊन मिसळले पाहिजे, समाजाशी समरस झाले पाहिजे. मनुष्यामध्ये उच्च व्यक्तित्व उत्पन्न करणे, त्याला उन्नत करणे, त्याला उदारचरित बनविणे या साऱ्या गोष्टी समाजसंस्था करूं शकते. त्या संस्थेमध्ये चारी पुरुषार्थांना अवसर आहे. ज्या मूल्यांवर, इस्लामची समाजसंस्था आधारली आहे त्याची बीजें हजरत मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या शेवटच्या मक्केच्या यात्रेवेळी जो सदुपदेश मुस्लिमांना केला, त्यामध्ये आपणांस


† Historical Roll of Islam Page, 44.


७८