पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

७७


इस्लामचा उदय झाला. सामाजिक अनवस्थेबद्दल असमाधान, कुजट मनोवृत्ति व जुलूम यांमुळे बहुजन समाजांत नवी चांगली समाजघटना निर्माण व्हावी अशी तीव्र आकांक्षा व धडपड निर्माण झाली होती. ख्रिश्चन धर्माचे जुन्या संस्कृतीचा आश्रय केल्यामुळे 'आहे तें टिकवून धररावें' या वृत्तीची कैफियत त्याला मांडावी लागे....

नव्या युगाला योग्य अशा समाजरचनेचा पाया घालण्याचे कर्तव्य ख्रिश्चन धर्म करूं शकला नाही. विश्वविजयाच्या स्वारीचे नेतृत्व तो स्वीकारूं शकला नाही. दलितांना त्याने मदतही केली नाही. उलट भावी काळांत सर्व सुखसमद्धि येणार आहे अशी जनतेची फसवणूक केली....ख्रिश्चन धर्माचे बांध फुटल्यामुळे नवीन प्रभावी धर्माची आवश्यकता इतिहासाच्या क्षेत्रांत भासू लागली होती. इस्लामी धर्माने नुसत्या पारलौकिक स्वर्गप्राप्तीची लालूच दाखविली नाही तर भौतिक विश्वावर विजय मिळविण्याची स्फूर्ति देखील दिली.. महंमदाने आपल्या लोकांनाच राष्ट्रीय ऐक्याचे व्यासपीठ निर्माण करून दिलें असें नाही तर आपल्या अरब बांधवांच्या हातीं अभिनव क्रांतीचा दीप दिला व त्याच्या दिव्य प्रकाशांत शेजारच्या सर्व देशांतील दलित व अकिंचन जनता एकत्र गोळा झाली. इस्लाम धर्माच्या विजयाची कारणे सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय ही आहेत."*


* Historical Roll of Islam, P. 52-53.