पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि संस्कृति
७६


चालली होती. कोठल्याही मोठ्या राजाच्या मत्यूनेंच कांही इतिहासांत घडामोडी होत नाहीत. अवनति किती तरी शतकें आधी चालू असते. बुद्धक्रांतीमुळे ती थोपवून धरली गेली होती. मात्र बुद्धक्रांति अशयस्वी झाल्यावर दुप्पट दौडीने अधोगति होऊ लागली. अप्रबुद्ध संन्याशांच्या अधःपाताने हिंदु साम्राज्याच्या अधःपातास मदत झाली व त्यामुळेच मुस्लिमांचा विजय सुलभ झाला.”
 हिंदुस्थानाप्रमाणे इतरत्रही संन्यासवादाचा जोरांत प्रादुर्भाव झाला होता. भाई रॉय म्हणतात, " त्या तमोमय काळांत अरबस्तानातील अवतारी पुरुषाचा आशादायक व तेजस्वी संदेश प्रदीप्तपणे चमकला व आशेची दिव्य ज्योतिच जणं त्या संदेशाने प्रदीप्त केली. नवीन धर्माने मिळणा-या भौतिक व पारलौकिक सुखाशेनें हजारों लोकांची मनें आकृष्ट झाली. भौतिक जीवनांत पराभत झाल्यामुळे निराश होऊन ज्यांनी अतिमानुषाच्या अस्तित्वावर विश्वासून आपणास रूढीच्या खड्डयांत बुडवून घेतले होते त्यांना इस्लामी धर्माच्या जयशाली तुतारीने जागें केलें. नैसर्गिक जीवनाचा मनमुराद उपभोग घेण्याची संधि मिळाल्यामुळे अवनत ख्रिस्ती धर्मानें प्रसृत केलेल्या संन्यासवादाच्या विकृत कल्पना पार नाहीशा झाल्या. आशेच नव क्षितिजच सामान्य जनतेला दिसले."*

 युरोपमध्येही तशीच अनवस्था असल्यामुळे इस्लाम धर्माचा विजय सहज सुलभ झाला. भाई रॉय म्हणतात, " त्या वेळची परिस्थिति इस्लामच्या अभिवृद्धीस अत्यंत अनुकूल होती. जन्या संस्कृतीताल सत्ताधीश वर्गाच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक व्हासाच्या वेळीच


* Historical Roll of Islam, P. 48.