पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
इस्लाम आणि संस्कृति


किल्ली कोणती ? तेव्हा तुम्ही त्यांना परमेश्वरी सत्य ओळखणे व सत्कृत्य करणे" असे उत्तर द्या.
 इस्लामी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर वरील आरोप केवढा 'फोल आहे याचे विवेचन करीत असतां, अलीकडील एक नामांकित धर्मोपदेशक रेव्हरंड ओहेरी म्हणतात, " जग पादाक्रांत करीत असतां, धर्मवेड्या मुस्लिमांनी पराभूत राष्टांतील जनतेला तलवारीच्या टोंकावर धरून इस्लाम धर्म स्वीकारावयास लावला वगैरे हकीकती म्हणजे पुन्हाः पुन्हा कथन करण्यांत आलेल्या अन्यंत हास्यास्पद व विकृत कथा होत असें इतिहासाने सिद्ध केले आहे.*

 इस्लामचा विद्यत्वेगाने प्रसार झाला त्याची कारणे काय आहेत हे आपण शोधून पाहिल्यानंतर वरील आरोपाची पूर्ण शहानिशा होईल व त्याबद्दल वाटणारा उरलासुरला संदेह नष्ट होईल. त्या वेळच्या "परिस्थितीचा आपण विचार केला म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इस्लाम प्रसरत झाला त्या त्या ठिकाणी इस्लाम धर्मास अनुकूल अशी भूमिका तयार झाली होती. धर्माची अवनती व त्यामुळे उत्पन्न झालेला अगतिकता व निराशा, पुरोहित वर्गाचा असह्य जाच, दलित वर्गाची कारुण्यमय अवस्था, वर्गयुक्त समाजरचनेचे प्राबल्य, -सामाजिक गोंधळ, आध्यात्मिक औदासिन्य या व अशा अनेक कारणांमुळे तेथे इस्लामचे स्वागत होऊ शकलें, भाई मानवेंद्र राय यांनी हा विषय अधिक विस्तृत रीतीने हाताळला आहे. त म्हणतात, " कितीही दडपशाही व छळ झाला तरी सर्व राष्ट्रच्या राष्ट्र आपल्या सनातन धर्माचा त्याग इतका अल्प विरोध दाखवून


*Islam at the Cross Roads, Page 8.