पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

७३


शत्रूशी लढतांना त्यांची बायकामुले व वृद्ध मंडळी यांच्या केसाला देखील धक्का लागतां कामा नये असा इस्लामचा कटाक्ष आहे. शत्रवरील राग त्यांच्या आप्तस्वकीय व बायकामले यांच्यावर काढणे हा धडधडीत अत्याचार आहे असें इस्लाम समजतो. हजरत पैगंबर युद्धाचे वेळी ' स्त्रिया, मुले व वृद्ध नागरिक यांच्यावर हल्ला करूं. नका' असा आपल्या सैनिकांस आदेश देत. त्यांच्यानंतरच्या स्खलिफांनी हा आदेश किती तंतोतंत पाळला आहे याचा उल्लेख मागे कोठेतरी केला आहेच.
 निव्वळ सूड घेण्याकरितां शस्त्र' हातांत धरणें इस्लामनें त्याज्य ठरविले आहे. मुस्लिमांचा असहय छळ करणाऱ्या कुरेशांविरुद्ध लढण्याची आज्ञा द्या अशी मुस्लिम सेनापति अब्दुररहिमान यांनी हजरत पैगंबरांना विनंती केली. त्यावेळी हजरत पैगंबर म्हणाले, " दया व क्षमा करण्याकरितां परमेश्वराची मला आज्ञा आहे; एवढयाकरितां हातांत तलवार घेऊन शत्रंशी लढाई करण्यास मी परवानगी देऊ शकत नाही." परधर्मीयांना ठार मारणे म्हणजे महापुण्य असा घोष करणाऱ्या जमान्यांत हजरत पैगंबरांनी "दया व क्षमा" यांचा पुरस्कार करावा ही कितीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. इब्न । खल्दन, गिबन या विख्यात इतिहासकारांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये धर्माच्या नांवावर लाखों लोकांची हत्या झाल्याचा उल्लेख आपणांस आढळून येतो. त्या काळांत इस्लाम धर्माचे प्रणेते हजरत पैगंबर . 25 यांनी दिलेला संदेश केवढा तरी उदात्त आहे. ते म्हणतात, "जनतेशी विनम्रतेने वागा; कठोर बनं नका. त्यांना न धिक्कारतां धीर, भरंवसा द्या. तुम्हांला पुष्कळ लोक विचारतील की स्वगाची गुरु-