पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
इस्लाम आणि संस्कृति


" जुलूम थांबेपर्यंत लढत रहा."


-पवित्र कुराण २:१९३.

 आपल्यावर होणारा जलूम थांबला की आपण शस्त्र खाली ठेविले पाहिजे; इतकेच नव्हे तर जे जुलूम करणारे असतील त्यांच्याविषयी वैरभाव देखील ठेवता कामा नये अशी त्याच श्लोकांत आज्ञा आहे. जुलूम करणारांवर डूक धरून त्यांच्याशी वैरत्वाचे नाते ठेवण म्हणजे पुन्हा नव्या लढ्यास उत्तेजन देण्यासारखें असल्यामुळ आपले मन द्वेषरहित ठेवण्याचा प्रयत्न करा असें पवित्र कुराणमध्ये सागितल आहे.
 "शांततेचा तह करण्याची त्यांची मनीषा असेल तर. तुम्हीही तह करण्याची तयारी दाखवा.”

-पवित्र कुराण ७:६३.


 आक्रमकांनी तह करण्याची तयारी दर्शविली तर आपणहा ताबडतोब तह केला पाहिजे. आक्रमक तहाची भाषा बोलतात म्हणून त्यांचा तो कमकुवतपणा समजून त्यांची पूर्ण रग जिरावण्याकरितां युद्ध तसेंच चालू ठेवणे किंवा सूडांच्या भावनेने त्याचा निःपात करण्याचा चंग बांधणे हे केव्हाही अन्यायाचे आहे अस इस्लामी युद्धनीति सांगते.
 संरक्षण व जुलमजबरदस्तीचा प्रतिकार याकरितांच तलवार हाती घेण्याचा इस्लामने आदेश दिला आहे हे वरील विवेचनावरून स्पष्ट झाले आहे. तलवार हाती घेण्याची परवानगी देण्यांत आली पण तिचे भीषण परिणाम घडं नयेत याविषयी इस्लामनें दक्षता घेतली आहे.