पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

६९


माझ्या मनाची पक्की खात्री झाली. पैगंबरांची अत्यंत साधी वृत्ति, जिविलक्षण स्वार्थत्याग, वचनबद्धता, आपल्या अनुयायांवरील निस्सीम प्रेम, अचाट धैर्य, निधडा स्वभाव, आपल्या कार्यावर व था परमेश्वरावर अढळ विश्वास या बहुमोल गुणांमुळे-तलवारी-
"मुळे नव्हे-प्रत्येक संकट निवारण होऊन हजरत पैगंबरांचे कार्य यशस्वी झाले.”

-महात्मा गांधी


 इस्लाम धर्म हा तलवारीच्या जोरावर फैलावला हा दुसरा गैरसमज फैलावण्यांत आला आहे. याचे जनकत्व ख्रिश्चन धर्मातील धर्मवेडे पाद्री व कांहीं ग्रंथकार यांचेकडे जाते. मध्ययुगीन काळांत झंझावाताच्या वेगाने होणारा इस्लामचा प्रसार पाहून त्या धर्माला बदनाम करण्याकरितां त्यांनी शिकस्तीचे प्रयत्न केले आहेत. स्वतःची अगतिकता व नैराश्य यांमुळे इस्लामशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य अंगी नसल्यामुळे त्यांना इस्लामवर शिंतोडे उडविण्याचा वाम मार्ग पत्करावा लागला. थॉमस कार्लाईलसारख्या जगद्विख्यात तत्त्वज्ञानें “पैगंबर व इस्लाम यांसंबंधाने ज्या खोटयानाट्या कंडया आम्ही पिकविल्या त्याबद्दल आम्ही लाजेनें खालीं माना घातल्या पाहिजेत" अशा स्पष्ट शब्दांत कबूलीजबाब दिला आहे. वरील आक्षेप कितपत खरा आहे, इस्लाम धर्मांत त्याबद्दल कांहीं आदेश देण्यांत आला आहे किंवा कसे याचा आपणांस थोडक्यांत विचार करावयाचा आहे.

" ला इकरादा फिद्दीन."


-पवित्र कुराण २:२५७.