पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
इस्लाम आणि संस्कृति


नष्ट केला त्या वेळी सॅबियन भिडूंनी आश्रयाकरितां अरबस्तानकडे धांव घेतली. जॉन बॅप्टिस्टसारखा हिब्र अवतारी पुरुष आपल्या अनुयायांसह आश्रयार्थ अरबस्तानांतच येऊन · राहिला होता. अलेक्झांडरच्या स्वारीमुळे हैराण झालेल्या पारशी लोकांना अरबस्तानांतच अभय मिळाले. या सर्व धर्मीयांना आबस्तानमध्ये संपूर्ण धर्मस्वातंत्र्य होते इतकेच नव्हे तर त्यांच्या तत्त्वज्ञानाला तेथें निःशंकपणे भरपूर वाव व खतपाणी मिळाले. " पौर्वात्य गूढवादी पंथांतून निर्माण झालेले ज्ञानवाद, एकरूपवाद, ग्रीक व ख्रिश्चन तत्त्वज्ञान या सर्वांचा सारखा विकास अरबस्तानच्या स्वतंत्र वातावरणांत होत होता. नेस्टोरियन, जैकोबाईट आणि युरिशियन पंथांप्रमाणे कॅथोलिक सनातनीही अरबांचें आतिथ्य चाखण्यास, त्यांचेच 'पांतीकर.' बनले." " जुने व . नवे, मुस्लिम युरोपियन अशा अधिकारी इतिहासकारांच्या पुराव्यांची छाननी करून, गिबननें असें सिद्ध केले आहे की महंमदाने आपल्या विधमा प्रजाजनांना व्यक्तिस्वातंत्र्याबरोबरच व्यापार व मालमत्ता यांचहा स्वातंत्र्य दिले होते. उपासनेचे तर स्वातंत्र्य होतेच होते. सहिष्णू असण्याचे धोरण महंमद व त्याचे एक दोन वंशज यांनी पाळल असें नसून अरबांचे वर्चस्व होतें तोपर्यंत अखंड पाळले जात होते."*

तलवारीच्या जोरावर (?)


" तलवारीच्या जोरावर इस्लाम धर्म फैलावला नाही, याबद्दल



+ Historical Roll of Islam, Page 36.


* Historical Roll of Islam, Page 44.