पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

६७


आणि तुझा देव व देवता यांची पूजा करण्यास दुसऱ्यास भाग पाड. जे तुझ्या धर्माचा स्वीकार करणार नाहीत आणि दुसऱ्या धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना कठोरपणाने शिक्षा कर. तुझ्या धर्माचा खरेपणा जे स्वीकारणार नाहीत त्यांच्यावर काडीमात्र दया करूं नकोस."
 पुढारलेल्या राष्ट्रांत देखील थैमान घालणारे धर्मवेड पाहिल्यानंतर हजरत पैगंबर हे सहिष्णुवादाचे केवढे श्रेष्ठ पुरस्कर्ते असले पाहिजेत याची आपणांस स्पष्ट कल्पना येते. आणखी एका उदाहरणाचा जातां जातां उल्लेख करावासा वाटतो. अरबस्तानात इस्लामी राज्य प्रस्थापित झाल्यानंतर ख्रिश्चन लोकांचे शिष्टमंडळ हजरत पैगंबरांस भेटण्याकरितां मदीनेस आले. रविवारी त्यांना प्रार्थना करावयास जागा मिळेना. शेवटी हजरत पैगंबरानी आपल्या मशिदीत त्यांना प्रार्थना करावयास परवानगी दिली. हजरत पैगंबरांच्या या औदार्याबद्दल त्यांना धन्यवाद देत तें शिष्टमंडळ आपल्या स्वस्थानी निघून गेले.
 हजरत पैगंबरांच्या आदेशानुसार परधर्मीयांना आचार विचार आणि धर्मस्वातंत्र्य देण्याची उदार परंपरा त्यांच्यानंतर झालेल्या खलिफांनी व राज्यकर्त्यांनी चालविल्याची अनेक उदाहरणे इस्लामच्या इतिहासांत सांपडतील. इस्लाम धर्माच्या या उदार सहिष्णु धोरणामुळे अरबस्तान हे परदेशांतील त्रस्त परधर्मीयांचे आश्रयस्थान बनले होतें. ईजिप्त, पर्शिया वगैरे देशांतील लोक रोमन राज्यकर्त्यांच्या जुलुमास कंटाळन अरबस्तानच्या आश्रयास येत. इराणनें असीरियाचे राष्ट जिंकले त्या वेळी तेथील ज्य नागरिक अरबस्तानमध्ये येऊन राहिले. मॅगीने बॅबिलोनियाचा धर्म