पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
इस्लाम आणि संस्कृति


 "मी ( हजरत पैगंबर ) मुसलमानेतरांना जी ही सनद देत । आहे तिचा मान ठेवावा असे प्रत्येक काळामधील मुस्लिमांना आग्रहपूर्वक सांगतों, परमेश्वराच्या नांवाने मी अशी ग्वाही देतों की या सनदेमध्ये जे वचन दिले आहे त्याप्रमाणे मुस्लिमांनी वागावे आणि ज्यामुळे माझ्या वचनाचा भंग होईल अशा वाईट रीतीने त्यांना वागवू नये. जर लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर त्यांना आपआपल्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक द्या; पण त्यांचा छळ किंवा जुलूम करूं नका; कारण त्यामुळे सृष्टिनिर्माता परमेश्वर नाराज होईल. या कराराचा भंग करणारास न्यायनिवाड्याच्या दिवसापर्यंत अपराधी म्हणून समजले जाईल. जो कोणी या लोकांचा छळ करील तो मलाच छळत आहे असे मी समजेन आणि त्यानंतर मला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोग नाही. अशा मनुष्यास नरकवास प्राप्त होईल.*
 हजरत मुहम्मद पैगंबरांच्या या असामान्य सहिष्णुवत्तींचा विचार करीत असतां, त्या काळच्या रोमन साम्राज्यामधील एक प्रसन ठळकपणे आपल्या नजरेसमोर उभा राहतो. त्या काळी रामन साम्राज्य पुढारलेलें व आघाडीवरचे समजले जात होते. ज्या वळा ऑगस्टस सिंहासनावर अधिष्ठित झाला, त्या वेळी रोमन इंपीरियल चर्चच्या आर्च बिशपनी त्यांच्याकडून जी शपथ घेवविली तिच भाषांतर “ History of European Morality and Civ1lisation " या ग्रंथांत खालीलप्रमाणे दिले आहे :-

" आपल्या देशांतील रीतिरिवाजाप्रमाणे देवादिकांची पूजा कर



* Fear Allah & take your own Part, P. 46.