पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

६५


श्रेष्ठ दर्जाची सहिष्णुता आहे याची आपणांस कल्पना येईल. ख्रिश्चन व ज्यू हे इस्लामचे कट्टे वैरी होते हे आपण मागे पाहिलेच; पण त्यांच्या दुर्बलतेचा, असहाय्यतेचा फायदा घेऊन भरपूर उट्टे काढण्याचा दुष्टपणा इस्लामधर्म-प्रणेत्यांनी केव्हाही दाखविला नाही. आपल्या राज्यांत वास्तव्य करणाऱ्या स्त्रिश्चन, ज्यू व पारशी जनतेस संपूर्ण धर्मस्वातंत्र्य देण्याची असामान्य दिलदार वृत्ती हजरत पैगंबरांनी प्रगट केली आहे. त्यांनी इस्लामी राष्ट्राचे सर्वाधिकारी या नात्याने ख्रिश्चन लोकांबद्दल जे फर्मान काढले ते असें:-
 "खिश्चन लोकांचे जीवित, संपत्ति आणि धर्म यांचे आम्हीं रक्षण करूं. त्यांच्या रीतिरिवाजांत आम्ही ढवळाढवळ करणार नाही किंवा त्यांच्या धार्मिक समजुती दुखविणार नाही. त्यांच्या धर्माध्यक्षांस पदच्युत केले जाणार नाही. त्यांच्या धर्मचिन्हांचा किंवा क्रॉसचा नाश केला जाणार नाही."
 ज्यू लोकांविषयी जे फर्मान काढण्यांत आले त्याचा आशय असा :-

 " ज्यू लोकांचे सर्व दृष्टींनी संरक्षण केले जाईल. त्यांच्यावर , जुलूम केला जाणार नाही किंवा त्यांच्या विरुद्ध त्यांच्या शत्रूला, कोणतीही मदत केली जाणार नाही. ज्यू लोकांना आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची पूर्ण मुभा आहे." त्याचप्रमाणे पारशी व मुस्लिमेतरांना सनद देण्यांत येऊन त्यांचे सर्व प्रकारचे हक्क अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली आहे. ती सनद अशी :-


+ The life of Mohamet by Sir William Muir, P. 192.


इ.सं.५