पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
इस्लाम आणि संस्कृति


"धर्माच्या बाबतीत अतिरेकी वर्तन करूं नका."


पवित्र कुराण ५:८०.


 अर्थात धर्मांध बनं नका असा इस्लामनें इशारा दिला आहे. धर्मांध मनुष्य म्हटला की तो अव्वल दर्जाचा असहिष्णु असतोच. इतर धर्म व त्यांचे प्रणेते यांची नालस्ती करणे, त्यांना हिणवणे, किंवा आपल्या धर्मसंस्थापकास देवाचा पुत्र बनवन इतरांना तुच्छ लेखणे इत्यादि गोष्टींचा समावेश धर्मांधतेत किंवा धर्माबद्दलच्या अतिरेकी वर्तनांत होऊ शकतो. अशा त-हेचे असहिष्णु व अविवेकी वर्तन इस्लामला मुळीच संमत नाही. धर्माच्या नांवावर चरितार्थ चालविणारा किंवा प्रतिष्ठा मिळविणारा गृहस्थच 'अतिरेकी' वर्तनास प्रोत्साहन देत असतो. या नीच वृत्तीवर, महान् मुस्लिम पंडित अल्लामा यूसफ अली यांनी विदारक प्रकाश पाडला आहे. वरील ऋचेवर भाष्य करतांना ते लिहितात, “ अतिरेक हा केव्हाही नेमस्तपणा व बुद्धिवाद यांच्या विरुद्ध असून, धर्माच्या. नांवावर व्यापार करणाऱ्या ढोंगी व स्वार्थी माणसाला पडताळून पाहण्याची सर्वांत सोपी पारख किंवा कसोटी आहे.....सत्य कांही वेळा दडविणे किंवा पायदळी तुडविणे म्हणजेच अतिरेक करणे होय."

 परधर्मीयांचें धर्मस्वातंत्र्य हिरावून घेणे, अधिकाराच्या जोरावर त्यांची मुस्कटदाबी करणे किंवा त्यांना जबरदस्तीने आपला धम स्वीकारावयास लावणे हे व यांसारखे दुसरे असहिष्ण प्रकार त्याज्य आहेत हे इस्लामने सिद्ध केले आहे. मदिनेचे सर्वाधिकारी झाल्यानंतर हजरत मुहम्मद पैगंबरांनी, परधर्मीयांचे हक्क संरक्षण्याकरितां । जे अनेक जाहीरनामे काढले ते पाहिले म्हणजे इस्लाममध्ये केवढी


+ The Holy Quran, Page 267.