पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
इस्लाम आणि संस्कृति


इन्कार करण्यांत आला आहे; इतकेच नव्हे तर येश ख्रिस्त व इतर धर्मसंस्थापक यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
 • इस्लामचा दृष्टिकोण विशाल आहे. निरनिराळ्या धर्म व धर्मसंस्थापकांनी त्या त्या देशांत, तेथील जनतेला अधःपातापासून वांचविण्याचे श्रेष्ठ कार्य केले आहे असे तो मानतो. मानव जातीवर झालेले प्रत्येक धर्माचे ऋण कबूल करण्याइतकी उदारता इस्लाम धर्मामध्ये आहे. कालपरिस्थितीनुसार प्रत्येक देशांत परमेश्वराने पैगंबर पाठविला आहे असें इस्लाम समजतो.

"प्रत्येक राष्ट्रामध्ये पैगंबर पाठविला आहे."


-पवित्र कुराण १६:३६.


 ज्या ज्या वेळी धर्मग्लानि होते, सत्य व न्याय पायदळी तुडविली जातात, सर्वत्र अनाचार माजतो त्या त्या वेळी जनतेला अधःपातापासून वाचविण्याकरितां त्या त्या देशामध्ये परमेश्वर पैगंबर पाठवून देतो. जनतेला परमेश्वराची व तिच्या थोर कार्याची आठवण करून देऊन तिला सन्मार्गी लावण्याचे श्रेष्ठ कार्य पैगंबर करीत असतात. प्रत्येक राष्ट्रांत एकच धर्म असं शकत नाही. निरनिराळ्या राष्ट्रात निरनिराळे धर्म संभवतात. प्रत्येक राष्ट्रांत परमेश्वराने पैगंबर पाठविला आहे म्हणजे प्रत्येक धर्मांत पैगंबरांचा अवतार संभवतो. ईश्वराचा संदेश आणणाऱ्या प्रत्येक पैगंबराबद्दल मुस्लिमाने आदराची भावना बाळगली पाहिजे. पवित्र कराणमध्ये तिसऱ्या अध्यायांत त्याच्यावर विश्वासही ठेवला पाहिजे असा स्पष्ट आदेश देण्यांत आला आहे.

" जे परमेश्वर आणि त्याचे पैगंबर यांच्यावर विश्वास ठेवितात