पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

६१


विचार व धर्मस्वातंत्र्य, पराभूत लोकांना मुस्लिमांनी दिलेली उदार वागणूक यांचा विचार केला म्हणजे इस्लामधर्म केवढा सहिष्णु आहे याची आपणांस कल्पना येईल. यापुढे जाऊन असें म्हणतां येईल की, इस्लाम धर्मानें जी सहिष्णुता दाखविली ती नुसती प्रशंसनीयच नव्हे तर आजकालच्या परिस्थितीत सर्वांनाच आचरणीय अशी आहे.

 परधर्म व परधर्म-संस्थापक यांच्याविषयी अनादर ही अव्वल दर्जाची असहिष्णता समजली जाते. परधर्म व त्यांचे संस्थापक यांची निंदा करणे, त्यांना शिव्याशाप देणे, त्यांचा धिक्कार करणे म्हणजेच धर्म अशी कल्पना एके काळी प्रसृत होती. त्या काळी ख्रिश्चन व ज्यू धर्मियांमध्ये तर एकमेकांना गालीप्रदान करण्यांत अहमहमिका लागली होती. या धुळवडीचा इस्लामधर्म-संस्थापकांना फायदा घेतां आला असता; पण हे अहिष्णु व गर्दा कार्य त्यांनी केले नाही. परधर्म व त्यांचे संस्थापक यांच्याविषयी नितांत आदर प्रदर्शित करून त्यांनी आपली असामान्य सहिष्णुवृत्ति जगाच्या निदर्शनास आणून दिली आहे. इस्लामधर्म दुसऱ्या धर्माची किंवा त्या धर्माच्या प्रवर्तकाची कधीच निंदा करीत नाहीं; उलट त्यांच्याविषयी आदराची भावना बाळगतो. प्रत्येक धर्माचा संस्थापक किंवा प्रवर्तक हा निष्कलंक आहे, त्याचे कार्य थोर आहे, त्याला सर्वांनी मान दिला पाहिजे अशी इस्लामची शिकवण आहे. बायबलमध्ये अब्राहम व जोसेफ आदि धर्मसंस्थापकांविषयीं जो अविश्वास व अनादर दाखविला आहे तो आपणांस पवित्र कुराणमध्ये कधींच दिसून येणार नाही. त्याचप्रमाणे ज्यू लोकांनी येशू ख्रिस्तावर त्याच्या जन्माबद्दल जे घाणेरडे आरोप केले आहेत त्याचा पवित्र कुराणमध्ये