पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
इस्लाम आणि संस्कृति


तो त्राहि भगवान् करील पण उद्यां तोच आपल्या डोक्यावर हात ठेवावयास कमी करणार नाही; हे नीट लक्षात ठेवून तो निर्माण होणार नाही अशी खबरदारी आपण घेतली पाहिजे.
 " आपल्या वाचेनें ब कृतीनें जो मानव जातीस दुखवीत नाहीं तो मुस्लिम होय."

-हजरत मुहम्मद पैगंबर.


 मुस्लिम म्हणविणारावर वाचा आणि कृती यांचे पावित्र्य सांभाळ्याची फार मोठी जबाबदारी आहे हे वरील वाक्यावरून सिद्ध होते. मानवता हा आपला श्रेष्ठ धर्म आहे असे त्याने समजले पाहिजे; आपल्या वाचेने आणि कृतीने त्याचे संवधर्न केले पाहिजे. इस्लाम धर्माचा वरील आदेश लक्षात ठेवून आपले आचारविचार शुद्ध, पवित्र व संशयातीत ठेवणे हे प्रत्येक मुस्लिमाचे पवित्र कर्तव्य आहे.
सहिष्णुता
 " सहिष्णु असण्याचे धोरण मुहम्मद व त्यांचे एक दोन वंशज यांनी पाळले असे नसून अरबांचे वर्चस्व होते तोपर्यंत अखंड पाळले जात होते."

-मानवेंद्र रॉय


 इस्लाम धर्माची अपुरी माहिती व अज्ञान यांमुळे जे गैरसमज पसरले आहेत व पसरविले जात आहेत, त्यांपैकी 'इस्लाम धर्म हा असहिष्णु आहे' हा एक होय. इस्लामधर्माची तत्त्वे, हजरत पैगंबरांनी काढलेली फर्मानें, परधर्मीयांना मिळालेले संपूर्ण आचार-


+ Historical Roll of Islam Page, 44.