पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

५९


 वाणीप्रमाणे कतीचेही पावित्र्य आपण सांभाळले पाहिजे. आपल्या हातून अशी कोणतीही कृति घडता कामा नये की ज्यामुळे आपल्या सभ्यतेस काळिमा लागेल. आपण आपली शक्ति, संपत्ति जाणि बुद्धिमत्ता लोकांच्या कल्याणाकरितां खर्चली पाहिजे. द्वेषाच्या किंवा मग्रुरीच्या आहारी जाऊन आपल्या शक्तिसंपदेचा कधीही दुरुपयोग करता कामा नये.
 "असभ्यता, दुष्टपणा आणि शिरजोर वृत्तींचा परमेश्वर धिक्कार करतो."

--पवित्र कुराण १६:९०.

 आपल्या असभ्य वर्तनाने लोकांची मने दुखविणे, आपल्या 'दुष्टपणाने त्यांना संकटांत लोटणे, आपल्या शिरजोर वृत्तीने त्यांची कुचंबणा करणे या साऱ्या गोष्टी माणूसकीला सोडून आहेत. मानव्याचे स्वास्थ्य बिघडवून टाकणाऱ्या अशा अनाचारांपासून शक्य तितकें दूर राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.
 " परमेश्वरा, अनाचार करणाऱ्या लोकांपासून मला वांचव."

-पवित्र कुराण २८:२१.


 अनाचारामुळे समाजाच्या स्वास्थ्याला धक्का पोहोचतो, त्याची घडी विसकटते, तो कमकुवत बनतो, त्यामध्ये बेबंदशाही माजते; याकरितां अनाचारांना पायबंद घालणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्यकर्म आहे. अनाचार करणारा कोणीही असो; त्याला अभय मिळतां कामा नये. आपल्या समाजांतील किंवा पक्षांतील लोकांनी अनाचार केले तरी त्यावर पांघरूण न घालतां, त्यांना न्यायासनासमोर खेचलें पाहिजे. अनाचार हा भस्मासुरासारखा असतो. आज प्रतिपक्षाला