पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
इस्लाम आणि संस्कृति



लोक प्रसन्न होतील असें वक्तव्य करणे, चांगले विचार बोलून दाखविणे, परमेश्वराचे नामसंकीर्तन करणे, अनाथ व असहाय्य लोकांस धीराचे बोल ऐकविणे अशा कितीतरी मागाँनी, सभ्य गृहस्थ आपल्या वाणीचे पावित्र्य राखीत असतो.
 "एकदां तुम्ही वचनबद्ध झालांत म्हणजे आपले वचन मोडू नका."

-पवित्र कुराण १६:९१.

 आपण दिलेले वचन परिपर्ण करणे म्हणजे वाणीचे पावित्र्य सांभाळणे होय. आपण एकाद्याला वचन दिले तर ते कोणत्याही परिस्थितीत पुरे करून दाखविले पाहिजे. आपण दिलेले वचन म्हणजे परमेश्वराजवळ घेतलेली शपथ आहे असे आपण समजल पाहिजे. आपले कार्य तडीस जावें म्हणन लोकांना वचने द्यावयाचा आणि नंतर ती सोईस्करपणे विसरून जावयाचें ही अधमवृत्ति केव्हाही निंद्यच होय.
"परमेश्वर दगलबाज माणसावर प्रेम करीत नाही."

-पवित्र कुराण ६:६०.

 आपण दिलेले वचन मोडणारा गृहस्थ दगलबाज समजला जाता अघळपघळ आश्वासने देऊन ती न पाळणे, भरपूर काम करून घेऊन मजुराला त्याच्या श्रमाचे पैसे देण्यास टाळाटाळ करण, लोकांचा विश्वासघात करणे, अनाथ स्त्रिया व मुले यांची मिळकत गिळंकत करणे, खोटेनाटे सांगून लोकांना फसविणे हे सारे प्रकार दगलबाजीत अंतर्भत होतात. समाजाची घडी विस्कटण्यास कारणीभूत होणाऱ्या अशा अश्लाघ्य प्रकारास प्रत्येकाने आळा घातला पाहिजे.