पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
इस्लाम आणि संस्कृति


व्यंगावरून, किंवा त्याच्या हातून चुकून घडलेल्या प्रसंगावरून त्याला टोपण नांवानें हिणवणे हे निंद्य मानले पाहिजे. गालीप्रदान, निंदा, कुचाळकी या गोष्टी सदभिरुचीस व सभ्यतेस सोडून असल्यामुळे त्यांपासून आपण सदैव दूर राहिले पाहिजे.
 इस्लामधर्मांत सभ्यतेस मोठे महत्त्व आहे. सभ्यता म्हणजे मनुष्याचा बहुमोल अलंकार असे समजले जाते. मनुष्याला परमेश्वराच्या स्वरूपाशी तद्रूप करणारे जे सद्गुण आहेत, त्यांमध्ये सभ्यतेचा इस्लामधर्मानें अंत:र्भाव केला आहे. आपल्या बोलण्याचालण्यांत व कृतींत में औदार्य आणि शिष्टता दिसून येते तिलाच आपण सभ्यता समजतो. मनष्याच्या सुसंस्कृत स्वभावाची पारख त्याच्या सभ्यतेवरून सहज करता येते.
 “ मणभर धान्याचा दानधर्म करण्यापेक्षा आपल्या मुलास सभ्यता शिकविणे अधिक चांगले आहे."

-हजरत मुहम्मद पैगंबर.


 इस्लाम धर्मांत दानधर्माचे महत्त्व मोठे आहे हे आपण मागे पाहिले आहे; पण या ठिकाणी त्याहून सभ्यतेचे जास्त महत्त्व मानण्यांत आले आहे. आपल्या वागणुकीने दुसऱ्यांना प्रसन्न करण हा सभ्यतेचा उद्देश असतो. आपल्या सहवासांत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या वागणुकीने आल्हाद देणे किंवा प्रसन्न करणे हा एक प्रकारचा परोपकारच आहे. दानधर्माने आपण गरजूंना संतुष्ट करूं पण सभ्यतेचा धर्म पाळून आपल्या सहवासांत येणाऱ्या अनेक गरीबश्रीमंत, लहानथोर इत्यादि लोकांना प्रसन्न करू शक. सभ्यतेचे धडे देणे हे दानधर्मापेक्षाही मोलाचे आहे असा आदेश