पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

५५


 दिसू लागते, तिच्या निर्मल चारित्र्यावर तो गिधाडासारखा तुटून पडतो. सालस स्त्रियांची निंदा करणारास ' सार्वजनिक शत्र ' समजून त्याचा धिक्कार केला पाहिजे, इतकेच नव्हे, अशा नीच गृहस्थास समाजांत देखील वावरू देऊ नये.
 "एकाद्याची गुप्तपणे चवकशी करूं नका किंवा त्याच्या पाठी. मागें निंदा करूं नका."

-पवित्र कुराण ४९:१२.


 लोकांची बिंगें शोधण्याची काही लोकांना खोडच असते; त्यांच्या स्नेह्यासोबत्यांजवळ जाऊन बारीकसारीक चवकशी करण्याचा निंद्य प्रयत्न ते सदैव करीत असतात. वास्तविक अशा प्रयत्नांपासून त्यांचा किंवा समाजाचा कांहींच फायदा नाही याची त्यांना जाणीव असत नाही. जो अमूल्य बेळ एखाद्या सत्कार्यांत खर्च करावयाचा तो वेळ हे सद्गृहस्थ दुसऱ्यांची कुचाळकी करण्यांत खर्च करीत असतात. असे रिकामटेकडे व हीन उद्योग करण्यास इस्लामने मनाई केली आहे.
 " लोकांचे दोष काढीत बसू नका किंवा टोपण नांवानें हिणवू नका."

-पवित्र कुराण ४९:११.


 चारचौघांसमोर एकाद्याचे दोष दाखवीत राहणे ही एक प्रकारची निंदाच आहे. कारण दुसऱ्याचे दोष दाखविण्यांत त्याची कधीच सदिच्छा असत नाही. दोष दाखवून तो गृहस्थ किती नालायक आहे हे सिद्ध करण्याचा तो खटाटोप असतो. तसेंच एकाद्याला टोपण नांवाने हिणवणे ही देखील प्रच्छन्न निंदाच आहे. शारीरिक