पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
इस्लाम आणि संस्कृति



जर समोर आली तर तिला न टाळतां आपण मोकळेपणाने तिची विचारपूस केली पाहिजे. तीच गोष्ट अतिथीची - अतिथीसत्कार हा एक महान् शिष्टाचार आहे. आपल्याकडे येणा-या पाहुण्याची योग्य बडदास्त ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य-कर्म आहे. आपली गैरसोय झाली तरी तिचा विचार न करतां अतिथीचा सत्कार केला पाहिजे; इतकेच नव्हे तर आपणांस नको असणारा पाहुणा आलाच तर त्याला देखील प्रेमळपणाची वागणूक दिली पाहिजे. 'यजमान घरी नाहीत' असें परभारें उत्तर देण्याची व्यवस्था करून पाहुण्याची व्याद न घालवितां आपण त्यांचे अंतःकरणपूर्वक आतिथ्य केले पाहिजे. केवळ नाइलाज म्हणून पाहुण्याचे स्वागत करावयाचे व तो निघून गेला म्हणजे त्याच्या नांवाने बोटे मोडावयाची, त्याची टवाळकी करावयाची निंद्य संवय इस्लामच्या दृष्टीने त्याज्य होय.

-पवित्र कुराण १०४.१.


" निंदा करणाऱ्या किंवा बदनाम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा धिक्कार असो."


 मनुष्याचा सर्वांत मोठा व अक्षम्य दुर्गुण म्हणजे त्याची निंदक वृत्ति. या अश्लाघ्य वृत्तीचा पवित्र कुराणांत अत्यंत कडक शब्दात धिक्कार करण्यांत आला आहे. अट्टल गुन्हेगारापेक्षाही निंदक निषेधार्ह समजला जातो. त्याला सद्विचार माहित नसतात, अंत:करणाच्या दिलदारपणास तो पारखी झालेला असतो, सभ्यतेच्या मर्यादा तो जाणीत नाही, खेळाडूवृत्ति त्याच्या ध्यानीमनीही नसते. लोकांची सतत निंदा करून त्याचे अंतःकरण काळवंडून गेलेले असते, त्याची नजर दोषी बनलेली असते. एकाद्या स्त्रीचे निष्पाप वर्तन त्याला गर्य वाटते, तिच्या निष्कपट वागण्यांत त्याला किल्मिष