पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

५३



 वाईट मनुष्याशी आपण चांगल्या रीतीने वागलों, त्याच्यावर दया केली तर मात्र त्याला स्वतःलाच आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटेल आणि तो चांगल्या मार्गाचा अवलंब करील. "वाईटाचा बदला चांगल्या गोष्टीने द्या" हा महान प्रयोग, वाईट किंवा दुष्ट माणसांच्या अंतःकरणाचें परिवर्तन करून त्याला सज्जन बनवं शकतो. हाच विश्वास पवित्र कुराणच्या वरील वाक्यांत प्रकट झाला आहे.
 प्रत्येक मुस्लिमाने प्रसन्नचित्त राहिले पाहिजे आणि त्याच्या सहवासांत येणारी व्यक्ति प्रसन्नचित्त होईल अशी खबरदारी घेतली पाहिजे. त्याचे आचारविचार, रीति-रिवाज, शिष्टाचार पाहून दुसऱ्यांना समाधान व आनंद वाटला पाहिजे. लोक आपल्यापासून फटकून वागतील अशा त-हेनें तुसडें वर्तन इस्लामने गर्दा मानले आहे. उद्दामपणाचा तर धिक्कार करण्यांत आला आहे. आपण कितीही श्रीमान् असलों, सत्ताधारी असलों, विद्वान असलो तरी आपण सदैव विनम्र असले पाहिजे; दुसऱ्यांशी वागतांना सहृदयता दाखविली पाहिजे.

लोकांना पाहन तिरस्काराने तोंड फिरवं नका."


– पवित्र कुराण ३१:१८.


 कोणाबद्दलही घृणा किंवा तिटकारा बाळगतां कामा नये. एकाद्या व्यक्तीबद्दल तिटकारा व्यक्त करतांना तिरस्काराने तोंड फिरविले जाते. ही वृत्ति इस्लामनें निषेधार्ह ठरविली आहे. अशा आचरणानें तो मनुष्य निष्कारण दुखावला जातो ही गोष्ट आपण लक्षात ठेविली पाहिजे. आपल्या नजरेपुढे नको असलेली व्यक्ति