पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

५१


 शेजाऱ्यांबद्दल नुसती शाब्दिक सहानुभूति न दाखवितां ती कृतीत आणून दाखविली पाहिजे. शेजाऱ्याच्या घरी जर उपासमार होत असेल तर आपण स्वतः अर्धपोटी राहून आपली अर्धी भाकर त्यांना दिली पाहिजे. आपण आकंठ जेवावयाचे आणि शेजारघरी उपवास घडावयाचा हे दृश्य जगाला कधीही दिसतां कामा नये.
 " जो गृहस्थ थोडा वेळ प्रार्थना करतो आणि थोडा दानधर्म करतो पण शेजाऱ्यांच्या कल्याणाकरितां अहर्निश झटतो तो श्रेष्ठ मानवांपैकी होय."

-हजरत मुहम्मद पैगंबर.


 मानव्य हे आपले ध्येय असल्यामुळे त्याचा उगम प्रथम घरांत होणे क्रमप्राप्त आहे. आपल्या कुटुंबांतील मंडळीशी, नातेवाईकांशी आपण आत्मीयतेने व प्रेमाने वागले पाहिजे. त्यानंतर शेजाऱ्यांशीही तसेंच वर्तन ठेविले पाहिजे. हा प्रेमाचा व सहानुभूतीचा परिघ असाच वाढत जाऊन त्यामध्ये सबंध मानवतेचा समावेश झाला पाहिजे.
 “दया हे धर्माचे चिन्ह आहे. ज्याच्याजवळ दया नाहीं त्याच्याजवळ धर्म नाही."

-हजरत मुहम्मद पैगंबर.


 धर्माचें महात्म्य, त्या धर्मातील दयेच्या शिकवणीवर अवलंबून असते. ज्या धर्मांत दयेचा पुरस्कार करण्यांत येत नाही तो धर्म या संज्ञेस पात्र होऊ शकत नाही. धर्मशील माणसाची सहृदय माणूस' अशी इस्लामची व्याख्या आहे. पांचवेळां नमाज पडणाऱ्या सद्गृहस्थाच्या अंतःकरणांत दयेचा मागमूसही नसेल तर