पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

४७



कबूल करून, त्याच्याशी मैत्री केली पाहिजे, या सर्व अटी पाळील त्यालाच मक्केची यात्रा करणेचा अधिकार पोहोचतो.

 यात्रेकरू मक्केजवळ जाऊन पोहोचल्यानंतर यात्रेच्या विधीस सुरुवात होते. आंघोळ करून प्रार्थना केल्यानंतर यात्रेकरू आपले कपडे उतरतो व फक्त कापडाचे दोन तुकडे पेहेरतो. एक तुकडा कमरेखाली घोटयापर्यंत व दुसरा कमरेच्यावर खांद्यापर्यंत. डोके उघडे ठेवावे लागते. हा नियम सर्व यात्रेकरूंनी पाळावयाचा असतो. राजा असो वा रंक असो, त्याने हा यात्रेच्या सुरुवातीचा विधी केलाच पाहिजे. या विधीस : एहराम ' अशी संज्ञा आहे. एहराम बांधल्यानंतर हजामत करणे किंवा नखें काढणें धर्मबाह्य ठरविले आहे. त्याचप्रमाणे त्याने कोणतीही हत्या करता कामा नये; इतकेच नव्हे तर अंगावरील बारीक जंतंची हत्या होईल म्हणून आंग खाजवावयास देखील मनाई करण्यांत आली आहे. यात्रा संपेपर्यंत या अहिंसा वृत्तीचे तंतोतंत पालन करावयाचे असते. निरनिराळे विधी केल्यानंतर गाळा यात्रा परिपूर्ण होते. मक्केची यात्रा करणारास 'हाजी' असे संबोधिण्यांत येते.

 मक्केची यात्रा करण्याकरितां जगांतील सर्व भागांतून, लाखों मस्लिम एकत्र जमा होतात; त्यामुळे मक्केला जगांतील मुस्लिम केंद्राचे स्वरूप येते. त्या ठिकाणी एकत्रित झाल्यामुळे आपण सर्व एकाच कुटुंबांतील आहोत ही भावना निर्माण होणे साहजिक आहे. यात्रेहून परत आल्यानंतर यात्रेकरू ही विश्वबंधुत्वाची विशाल कल्पना बरोबर घेऊन येतो व त्यामुळे त्याचा दृष्टीकोन व्यापक होण्यास बरीच मदत होते.