पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

४३


 " परमेश्वरा, ज्यांच्यावर तुझा कृपाप्रसाद झाला आहे अशांचा सन्मार्ग आम्हांला दाखीव. वाममार्गाने जाणान्यांचा किंवा ज्यांच्यावर तुझा कोप झाला आहे अशांचा मार्ग आम्हांला दाखवू नकोस."
 "हे परमेश्वरा ! आम्हांला इहलोकी व परलोकी भलेपणा ब. कृपा दे आणि आम्हांला नर्कानीच्या दुःखापासून मुक्त करून आमचे संरक्षण कर. हे अत्यंत दयाळू परमेश्वरा, तुझ्या दयेनें व कृपेने मला व माझ्या आईबापांना क्षमा कर आणि त्यांच्यावर दया कर. 7. त्यांनी बालपणापासून वाढविलें आहे म्हणून त्यांच्या चांगुलपणा बद्दल त्यांना बक्षीस देऊन त्यांच्या चुकांची क्षमा कर."

उपवास


 प्रत्येक मुस्लिमानें वर्षांतून एक महिना (रमजान ) उपवास केलाच पाहिजे अशी धर्माज्ञा आहे. मनुष्याच्या अंतःकरणाची शुद्धि व्हावी आणि वाईट मनोवृत्तीपासून परावत्त होण्याकरितां त्यांच्यामध्ये शक्ति निर्माण व्हावी हा या उपवासाचा मुख्य हेतु आहे. उपवास म्हणजे संयम व सहनशीलता निर्माण करण्याचे एक महान साधन. उपवास करतांना संबंध दिवसभर अन्नपाणी वर्ज करावयाचे असते. फक्त पहांटे व सूर्यास्तानंतर मनुष्याने हलका आहार घ्यावयाचा असतो. उपासकाली प्रत्येकाने 'मनोवाक्कायकर्मभि:' पावित्र्य पाळले पाहिजे. त्या काळांत तोंडांतुन अपशब्द काढणे, निंदा करणे, दुसऱ्यास टाकून बोलणे, रागावणे किंवा विलास करणे त्याज्य ठरविण्यात आले आहे. या गोष्टी आपण केल्या तर त्या उपवासाचा काडीमात्र उपयोग नाही. 'परमेश्वराच्या दृष्टीने असा उपवास व्यर्थ आहे.' असें हजरत पैगंबरांनी निवेदिले आहे.