पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
इस्लाम आणि संस्कृति


' तहाज्जुद ' नमाज आदा करावी असा आदेश आहे. प्रार्थना करण्यापूर्वी एका गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे आणि ती म्हणजे “शूचिर्भूतपणा' ही होय, वजू केल्याखेरीज किंवा शूचिर्भूत झाल्याखेरीज प्रार्थना करता येत नाही. प्रथम हात धुतल्यानंतर तोंड च नाक पाण्याने स्वच्छ करावे लागते. नंतर तोंडाचा भाग धुवावा लागतो. नंतर कोपयापर्यंत हात धुऊन डोक्यावरून पाण्याचा हात फिरवावा लागतो. शेवटी घोट्यापर्यंत पाय धुतल्यानंतर शुचिर्भूत'पणाचा हा विधि परिपूर्ण होतो. या विधीस वजू' असें नाव आहे. प्रत्येक प्रार्थनेच्या अगोदर म्हणजे दिवसांतून पांच वेळा शुचिर्भत व्हावे लागते. एकादा मनुष्य प्रवासांत असेल किंवा पाणा मिळण्याची सोय नसेल तर स्वच्छ जमिनीवर दोन्ही हात ठेवाव नंतर तोंडावरून आणि हाताच्या मागच्या भागावरून हात फिरवावा या विधीला 'तयम्मूम' असे म्हणतात. यानंतर त्या व्यक्तीला प्राथना करावयास हरकत नाहीं. धोक्याच्या काळांत किंवा प्रवासात उभ्यानेच प्रार्थना करण्याचा आणि अशी प्रार्थना थोडक्यात आटोपती घेण्याचा आदेश पवित्र कराणमध्ये देण्यांत आला आहे .
 प्रार्थना मशिदीत, घरी, उघड्या मैदानावर किंवा कोणत्याही स्वच्छ ठिकाणी करता येते. प्रार्थना करतांना आपले अंतःकरण निर्मळ ठेवावे लागते. प्रार्थना चालू ठेवावयाची आणि मनांत भलतच विचार यावयाचे हा प्रकार केव्हाही योग्य ठरत नाही. अशी प्राथना व्यर्थ समजली जाते. प्रार्थना करतांना पवित्र कराणमधील ज्या ऋच्या म्हटल्या जातात, त्यामध्ये केवढेतरी उदात्त व मंगल विचार भरलल असतात.
 उदाहरण म्हणून एक दोन ऋच्या पुढे उद्धृत केल्या आहेत.