पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

३९


“तर तर्क किंवा अनुमानसिद्धांत यांचा अवलंब करून ते कार्य करीन." हजरत पैगंबरांनी या उत्तराबद्दल समाधान व्यक्त केले, इस्लाममध्ये अनुमानसिद्धांताला केवढा वाव ठेवला आहे हे ' कयास' तत्त्वावरून दिसून येईल.

 शरीयत (इस्लामी कायदेशास्त्र ) ही पवित्र कुराण, हदीस, इज्मा व कयास यांवर आधारली आहे. इस्लामी कायदेशास्त्र म्हणजे। नुसत्या नियमांची जंत्री नसून प्रगति व विकासाच्या भरभक्कम व शाश्वत पायावर आधारलेली शास्त्रशुद्ध तत्त्वप्रणाली आहे. पाश्चात्य ग्रंथकारांच्या टीकेला उत्तर देतांना एक मुस्लिम ग्रंथकार म्हणतो, " निरनिराळ्या काळाशी व लोकांशी जुळते घेण्याची विलक्षण शक्ति मुस्लिम कायद्यामध्ये आहे; त्यामुळे तो मानव प्रगतीबरोबर पाऊले टाकीत जाऊ शकतो. सुप्रसिद्ध मुस्लिम कायदेपंडित न्यायमूर्ती सय्यद अमीर अली हे तर स्वच्छ म्हणतात की, "मुस्लिम कायद्यामध्येच विकासाचे तत्त्व अंतर्भत झाले आहे." रद्दल मुहतारमध्ये त्यांनी केलेल्या विधानास संपूर्ण पुष्टि मिळते. कायरो युनिव्हर्सिटीमधील फॅकल्टी ऑफ लॉचे डीन व ईजिप्तमध्ये नावाजलेले इस्लामी कायद्याचे तज्ज्ञ डॉ. अब्दुर रझाक सनावरी यांनी तर जगाच्या बदलत्या परिस्थितीशी ब काळाशी इस्लामी कायदा समरस होऊ शकतो असें आग्रहपूर्वक प्रतिपादन केले आहे.

पांच आधारस्तंभ

 (१) धर्मावर श्रद्धा (२) नमाज (३) उपवास (४) दानधर्म व ।

† Islam in the World, Page 45. Quoted in Al-Fith ( Islamic Weekly Cairo ) Vol. XI, No. 535.


† Islam in the World, Page 45. Quoted in Al-Fith ( Islamic Weekly Cairo ) Vol. XI, No. 535.