पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
इस्लाम आणि संस्कृति


एक विद्वान् धर्मशास्त्रज्ञ म्हणतात, " इज्मा हे मुस्लिम कायद्याच्या (शरीयतचे ) चार उगमस्थानांपैकी एक उगमस्थान असून त्या कायद्याच्या उत्क्रांतिवादाची ती किल्ली आहे हे आपण विसरतां कामा नये. इस्लामी कायद्याचे स्थितिस्थापकत्व टिकवून त्याच्या. विकासास वाव देणारे व त्यास सदैव ताजातवाना ठेवणारे तत्त्व म्हणजे इज्मा होय."

 'कयास' याचा अर्थ अनुमान सिद्धांत. एकाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष उल्लेख कुराणांत किंवा हदीसमध्ये आढळला नाही तर त्याच नमुन्यांचे, पवित्र कुराण किंवा हदीसमध्ये आढळणाऱ्या गोष्टींपासून अनुमान काढणे याला 'कयास' म्हणता येईल. उदाहरणार्थ, शराब ही निशा आणणारी चीज असल्यामुळे ती निषिद्ध आहे असा पवित्र कुराणमध्ये आदेश आढळतो. त्यावरून निशा आणणाऱ्या जितक्या चीजा आहेत (मग त्यांचा उल्लेख पवित्र कुराण किंवा हदीसमध्य नसला तरी) त्या सर्व निषिद्ध आहेत असें अनुमान आपणास कयास' या तत्त्वाने काढता येते. हदीसमध्ये या तत्त्वाला माला आधार सांपडतो. एकदां हजरत पैगंबरांनी एका विवक्षित कायाकरितां एका मनुष्यास पाठवून देण्याचे ठरवून त्याला विचारले, "ह कार्य करतांना कोणच्या आधारें तूं वागशील?" तो गृहस्थ म्हणाला, " पवित्र कराणच्या आधारें." त्यावर हजरत पैगंबर म्हणाल, "पण सदर प्रसंगी कसे वागावे याचा उल्लेख तुला पवित्र कुराणमध्य आढळला नाही, तर काय करशील?" त्या गृहस्थाने उत्तर दिले, “मी हदीसच्या आधारे वागेन." यावर हजरत पैगंबर उद्गारले, " हदीसमध्ये तसा उल्लेख नसेल तर ?' शेवटी तो गृहस्थ म्हणाला,


† Islam in the World, Page 51.