पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
इस्लाम आणि संस्कृति


(५) मकची यात्रा, हे पांच इस्लाम धर्माचे आधारस्तंभ समजले जातात. वरील पांच महान् तत्त्वांचा प्रत्येक मुस्लिमाने अवलंब केलाच पाहिजे.
धर्मावर श्रद्धा
 इस्लाम धर्मावरील श्रद्धा ही एकाच वाक्यांत प्रदर्शित केली जाते. या वाक्यास 'कलिमा' (कल्मा ) अशी संज्ञा आहे. मुस्लिमेतर, या वाक्याचा उच्चार केल्याखेरीज किंवा कलिमा पढल्याखेरीज मुस्लिम होऊ शकत नाही. तो कलिमा म्हणजे “ला इलाहा इल्ललाह मोहम्मदुर रसुलुल्लाह " ( एका परमेश्वराखेरीज दुसरा देव नाहीं: हजरत मुहम्मद है त्यानेच पृथ्वीवर पाठविलेले पैगंबर होत ). या एकाच वाक्यात इस्लामचे ध्येय समाविष्ट केले आहे. परमेश्वरावर अढळ विश्वास ठेवणे हे प्रत्येक मुस्लिमाचे आद्य व पवित्र कर्तव्य आहे. परमेश्वरावर विश्वास यांचा अर्थ परमेश्वराचे जे उदात्त गण वर्णिले आहेत, त्या गुणांचा शक्य तितका अंगीकार करणे होय. परमेश्वर म्हणजे मूतिमा सत्य व न्याय; परमेश्वर म्हणजे दयेचा सागर व औदार्याचा कळस, परमेश्वर म्हणजे शांततेचे व मानवतेचे प्रतीक. प्रत्येक मुस्लिमान पवित्र कराणमध्ये वर्णिलेले परमेश्वराचे उदात्त स्वरूप आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच धर्मावरील श्रद्धा प्रकट करणे हाय. आपणही सत्याचा, न्यायाचा पुरस्कार केला पाहिजे; आपल्या अंतःकरणामध्ये ऋजता निर्माण केली पाहिजे; आपण उदारचरित झाले पाहिजे; मानवता हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य समजून त्याप्रीत्यर्थ आपले सर्वस्व वाहण्याची तयारी दर्शविली पाहिजे; परमेश्वर मानवांवर प्रेम करण्याने संतुष्ट होतो, त्यांची दुःखें व यातना दूर