पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

३५



अधिकृत प्रत तयार करण्यांत आली. त्या प्रतीवरून अनेक प्रती काढण्यात येऊन त्या सर्वत्र पाठविण्यांत आल्या. पवित्र कुराण मखोदत करण्यास त्या काळी प्रोत्साहन दिले जात असे आणि आज अद्यापही दिले जाते. पवित्र कराण मुखोद्गत म्हणणारास 'हाफीज' अशी संज्ञा आहे.
 पवित्र कराण हे अनेक नांवांनी संबोधिले जाते. अल-किताब (२:२), अल-फुरकान् (२५:१), अज-झिक (१५:९) अल-हदीस (१८:६), अल-हुक्म (१३:३७), अल-हुदा (२:२), अ-राहमत् (१७:८२), अल्-खैर (३:१०३), अल-बयान (३:१३७), अन्नूर (७-१५७), अल-हक्क (१७:८१), अल-मुबारक (२१:५०) वगैरे नांवांचा उल्लेख पवित्र कुराणमध्ये त्या नांवांपुढे केलेल्या आग व ऋचांमध्ये आपणांस आढळून येईल.
 पवित्र कुराणची भाषा अत्यंत सुंदर, ओघवती व परिणामकारक आहे. त्यामधील प्रत्येक शब्द वेंचक व मांडणी डौलदार आहे. कित्येक वेळां तें वाचण्यापेक्षां ऐकण्यांतच जास्त आल्हाद होतो.. विशेषतः परमेश्वराच्या भव्य व उदात्त स्वरूपाचे त्यामधील वर्णन तर अत्यंत हृद्य आहे. पवित्र कुराणचें ज्यांनी इंग्रजी भाषांतर केले आहे. ते मि. सील पवित्र कुराणच्या वाङ्ममयीन श्रेष्ठतेबद्दल लिहितात, " श्रोतवंदांच्या मनावर ते इतकें पकड घेत असे की पैगंबरांचे कट्टे विरोधक देखील मंत्रमुग्ध होत.” हजरत उमर हे सुरुवातीस हजरत पैगंबरांचे वैरी होते. ते स्वतः हजरत पैगंबरांना ठार मारण्यास निघाले असता, त्यांच्या बहिणीच्या तोंडून बाहेर पडत असलेली पवित्र कराणमधील कांही वाक्ये त्यांनी ऐकली. त्याबरोबर ते थांबले व त्यांनी ती वाक्ये अनेक वेळां वाचली. त्या वाक्यांनी त्यांच्या