पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
इस्लाम आणि संस्कृति



टिपून ठेवीत. या ऋच्यांचे संकलन म्हणजेच पवित्र कुराण होय. सुरुवातीस पैगंबरांच्या शत्रंनी त्या ऋच्या ईश्वरप्रणित नसून त्यांनीच बनविल्या आहेत असा आक्षेप घेतला. पण पवित्र कुराणमधील ऋच्या भाषेच्या व व्याकरणाच्या दृष्टीने इतक्या श्रेष्ठ दर्जाच्या आहेत की हजरत मुहम्मद पैगंबरासारख्या एक अक्षरही लिहितां वाचतां न येणाऱ्यांना त्या तोडीच्या ऋचा स्वतः, बनविणे शक्य नाही, इतकेच नव्हे तर त्यामधील भव्यता व उदात्तता चित्रित करणे कोणाही मानवास शक्य नाही असे तेथील विद्वानांनी पटविल्यानंतर त्या 'अपौरुषेय' आहेत असा त्यांच्या शत्रंना शेवटी निर्वाळा द्यावा लागला. इस्लाम धर्माच्या पुष्टयथ एकादा चमत्कार करून दाखवा असें हजरत पैगंबरांच्या विरोधकांना त्यांना सांगितल्यानंतर पवित्र कुराणकडे बोट दाखवून त्यासारखा एकादी ऋचा तयार करून दाखवा असे आव्हानपूर्वक म्हणत. सब मुस्लिम जगत् पवित्र कुराण म्हणजे 'शाश्वत चमत्कार' असे मानत.
 सबंध पवित्र कुराणचे प्रगटीकरण होण्यास तेवीस वर्षे लागला.. परिस्थिती व प्रसंगानुसार निरनिराळ्या वेळी पवित्र कुराणचे प्रगटीकरण होत असे. पवित्र कुराणचे एकंदर ३० भाग (जूज) असून ते ११४ प्रकरणांत (सरा) विभागले आहेत. प्रत्येक भागाचे चार उपभाग करण्यांत आले आहेत. या भागांची जळणी हजरत पैगंबरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यांत आली आहे. पवित्र कुराणमधील निरनिराळ्या भागांचे संकलन करण्याचे कार्य हजरत अबुबकर यांच्या आज्ञेने करण्यांत येऊन तें हजरत उस्मान यांच्या कारकीदीत पुरे करण्यांत आले. हे महत्त्वाचे कार्य झैद, अबदुल्ला आणि अब्दुर रहीम या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली करण्यांत येऊन पवित्र कुराणची