पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

३३


हे महत्त्वाचे कार्य आहे असें इस्लाम समजतो. उदाहरणार्थ राग, हा एक मनोविकार आहे. त्याला दडपून टाकण्यांत तो केव्हाही नुकसानीच करतो. त्याला मोकाट सोडला तर त्याचे पर्यवसान जुलूम, जबरदस्ती, छळ, अपशब्द किंवा निंदा यांमध्ये होते. याच मनोविकाराचें परिवर्तन केले तर शौर्य, धैर्य, सहनशीलता, दीर्घोद्योग, सहिष्णुता व क्षमा या उदात्त नैतिक मूल्यांत त्याचे रूपांतर होते. मानसिक उत्क्रांतिवादाचा हा एक प्रकार इस्लाम धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.

पवित्र कुराण


 मस्लिमांचा सर्वश्रेष्ठ व एकमेव धर्मग्रंथ म्हणजे पवित्र कुराण होय. जगांतील कोणत्याही देशांतील कोणत्याही मताचा मुस्लिम असला तरी पवित्र कुराणबद्दल त्याला अत्यंत आदर वाटतो. इतर धार्मिक गोष्टींबद्दल त्याचा मतभेद असेल किंवा एकाद्या तत्त्वांबद्दल तो सहमत होणार नाही पण पवित्र कुराणबद्दल मात्र कोणताही मुस्लिम सहमतच होईल. जगांतील अनेक धर्मग्रंथांत काळ व प्रसंगानुसार बरेच फेरफार झालेले दिसून येतात; पण आज तेराशें वर्षांत कुराणमधील वाक्यांत किंवा शब्दांत काडीमात्र फरक झाला नाही. पवित्र कुराण इतकें पवित्र मानले जातें की वजू (शुचिर्भूत) केल्याशिवाय त्याला सहसा कोणी स्पर्श करीत नाही. पवित्र कुराण परमेश्वराकडून प्रकट झाले आहे; तें ईश्वरनिर्मित आहे असे समजले जाते. ज्या ज्या वेळी हजरत मुहम्मद पैगंबर ध्यानमग्न होत, त्या वेळी बाह्य जगाशी त्यांचा संबंध तुटत असे. आपल्या भोंवतीं काय चालले आहे हे त्या वेळी विसरून जात. अशा ध्यानमग्न अवस्थेत असतांना त्यांच्या तोंडून ज्या ऋचा बाहेर पडत, त्या जवळचे लोक इ.सं.३