पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
इस्लाम आणि संस्कृति


 संघर्ष होतोच; पण इस्लाममध्ये अशा त-हेचे खडाष्टक कधींच दिसून येणार नाही. नबयुगाच्या कल्पनांशी विरोध न करतां, त्या आत्मसात करण्याचे उदार धोरण त्याने आपल्यासमोर ठेविले आहे. काळ व परिस्थितीनुसार इतर धर्मग्रंथांतून बदल करण्यांत आला आहे, पण पवित्र कुराणामध्ये तसा काडीमात्र बदल झाला नाही, ही एकच गोष्ट इस्लामचा उदारमतवाद स्पष्टपणे सिद्ध करीत आहे.

 इस्लाम आणखी एका बाबतींत पुरोगामी आहे. त्याची मानवी जीवनाकडे पाहण्याची दृष्टि कांहीं धर्मांपेक्षां निराळी आहे. मनुष्य जन्मतःच पापी असतो आणि त्या पापापासून मुक्त करण्याकरिताच धर्माचा अवतार आहे, या कल्पनेशी इस्लामचा सक्त विरोध आहे. मानवी स्वभाव निसर्गतः पापापासून अलिप्त असतो. पाप हा वारसा ( Heritage ) नसून, नंतरची माणसाने लावून घेतलेली उपाधा आहे. या उपाधीपासून मनुष्यास अलिप्त ठेवणे व सुप्तावस्थत असलेल्या त्याच्या चांगल्या भावनांचा विकास करणे हे धमाच प्रधान कार्य आहे असें इस्लाम समजतो. धर्म म्हणजे अधःपातापासून मुक्ति नव्हे तर मनुष्यामध्ये अप्रकटपणे वास करीत असलेल्या शक्तीचा बिकास होय. निसर्गातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे, मनुष्याच्या भावना किंवा प्रवृत्ति सुप्तावस्थेत असतात. त्या जागत करून त्यांचा वाढ व विकास करणे यालाच इस्लाम 'धर्म' अशी संज्ञा देतो. त्याचप्रमाणे मनुष्याच्या मनोविकारांना नेस्तनाबूद करणे किंवा दडपून टाकणे अनैसर्गिक ठरते. मनोविकार हे सदैव उत्क्रांति अवस्थेत असतात. नैतिक व आध्यात्मिक उन्नतीची बीजे त्यांच्यापोटी आढळतात. मनोविकारांना दडपून न टाकतां किंवा मोकाट न सोडतां, त्यांना योग्य मुरड घालून त्यांचे सद्गुणांत परिवर्तन करणे