पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

३१



लोकांच्या धार्मिक भावनांचा या वर्गाने भरपूर फायदा घेतला आहे, इतकेच नव्हे तर सार्वजनिक जीवनांत स्वतःचे प्रस्थ वाढवून, जनतेला सतावून सोडले आहे. जनतेच्या पैशावर जगावयाचें, चैन करावयाची आणि जनतेलाच त्राही भगवान करून सोडावयाचे हा कृतघ्नपणा या वर्गाने केला आहे. आपण सांगं त्याप्रमाणे जनतेने वागलेच पाहिजे अशी हुकूमशाही त्याच्या रोमरोमांत भरून राहिली आहे. जातिबहिष्काराचें अमानुष शस्त्र त्याच्या हाती असल्यामळे अनेक विवेकशील माणसांचा त्या वर्गाने छळ मांडला आहे. या शिवाय प्रगति आणि विकास यांचा संकोच करण्याचे महापाप या वर्गाने केले आहे. इस्लामने पुरोहित वर्गाचे अस्तित्वच नष्ट करून टाकल्यामुळे मानवांचे स्वास्थ्य व प्रगती यांचा मार्ग सुकर झाला. ही गोष्ट इतिहाससिद्ध आहे.
 शब्दप्रामाण्य किंवा हटवाद ( Dogamatism ) इस्लाम धर्मांत। नाही हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. आपले प्रतिपादित तत्त्व सर्वांनी डोळे झांकून मानलेच पाहिजे असा आग्रह न धरतां, मनुष्याच्या सदसद्विवेक बुद्धीस आवाहन करण्याचे कार्य इस्लामनें केलें आहे. हटवाद व भौतिक शास्त्रे यांमध्ये सदैव उभा दावा असलेला आपण पाहतों; पण इस्लाममध्ये असें विरोधी दृश्य आढळत नाही. भौतिक शास्त्रांच्या नव्या कल्पना, शोध व विचार यांना इस्लामकडून कसे प्रोत्साहन मिळाले आहे हे पुढील एका प्रकरणावरून वाचकांच्या लक्षात येईल.
 हटवाद किंवा नव्या युगांतील कल्पना यांमध्ये कधींच सख्य असत नाही. हटवाद अंधश्रद्धेचा पुरस्कार करतो तर बुद्धिवाद नव्या कल्पनांना उचलून धरतो. हटवादी धर्माचा नवविचाराशी