पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

२७



नांवावर हजारों लोकांच्या पंक्ति उठविल्या तरी तो त्याकडे लक्ष देत नाही किंवा बलिदानाचे ढोंग करणाऱ्या लठ्ठभारतीची तो कधीच पर्वा करीत नाही.
 " तुम्ही केलेल्या बलिदानाचे रक्त किंवा मांस परमेश्वरास पोहोचत नाही. तो एकच गोष्ट स्वीकारतो आणि ती म्हणजे तुमची त्याच्यावरील भक्ति."

-पवित्र कुराण २२:३७.

 परमेश्वरावरील भक्ति म्हणजे त्याने आदेशित केलेल्या तत्त्वांचे परिपालन, सदाचार व सद्विचारांचे अवलंबन. मानवांची उन्नति व्हावी, त्यांना सौख्य लाभावे, त्यांचा उद्धार व्हावा याकरितां होणारे अहर्निश प्रयत्न म्हणजेच परमेश्वरावरील भक्ति, परमेश्वराची सेवा. असे अहर्निश प्रयत्न करणाऱ्या महाभागांवर परमेश्वर सदैव प्रसन्न असतो, त्यांच्यावर प्रेम करतो, असें पवित्र कुराणामध्ये स्पष्ट दिग्दर्शित केले आहे.
 " परमेश्वराने निर्माण केलेल्या प्राणिमात्रांचे कल्याण करा; कारण जे कल्याण करतात त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो."

-पवित्र कुराण २२:३७.

 एकेश्वरवादानें विश्वबंधुत्वाचा व मानवतेचा मार्ग सुकर करून टाकला आहे. ज्याचा परमेश्वरावर विश्वास आहे त्याच्याजवळ आपपर भाव राहूच शकत नाही. कुटुंब, जमात किंवा राष्ट्र यांपुरतेच विचार न करतां तो सर्व विश्वाकडे आत्मीयतेने पाहूं लागतो. आपल्या कुटुंबाभोंवतीं किंवा जमातीभोंवतीं घुटमळणारी त्याची सदिच्छा मानव जातीकडे झेप घेऊ लागते. अखिल मानव जातीचा तो निर्माता