पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
इस्लाम आणि संस्कृति



किंवा सत्ता परमेश्वराच्या कृपेने मिळाली असून, त्याला वाटेल तर तो ती काढून घेऊ शकतो या गोष्टीवर त्याचा विश्वास असतो. त्याचप्रमाणे आपले कार्य करितांना तो द्वेष, हेवादावा किंवा अभिलाष यांच्या आहारी जात नाही. त्याला वाटते यश देणे न देणे हे परमेश्वराच्या हाती आहे. यश द्यावें असें त्याच्या मनांत आले तर जगांतील कोणतीही व्यक्ति किंवा शक्ति त्याला प्रतिबंध करूं शकत नाहीं; मग आपल्या इप्सित कार्याकरितां दुसऱ्याचा द्वेष किंवा हेवादावा करून त्याचा उपयोग काय ? परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून आपले कार्य अविरतपणे करीत राहणे हेच आपले कर्तव्य आहे असें तो समजतो.
 परमेश्वरावर ज्याचा संपूर्ण विश्वास आहे तो निषिद्ध गोष्टीपासून व कुकर्मापासून सदैव अलिप्त राहतो. परमेश्वराला ज्ञात व अज्ञात गोष्टी कळू शकतात. तो दिव्यचक्षू असल्यामुळे आपण केलेली गाष्ट जगाला दिसली नाही तरी त्याला दिसते. अंधारांत जरी आपण दुष्कृत्य केले तरी तो पाहू शकतो; इतकेच नव्हे तर आपल्या अंतःकरणांतील वाईट विचाराचे पडसाद तो ओळखू शकतो. या विचारसरणीमुळे मनुष्य दुष्कृत्यापासून, अनाचारापासून सदव दूर राहतो. मानवी शील तयार करण्यांत परमेश्वरावरील अढळ विश्वासाचा केवढा मोठा उपयोग होत असतो हे स्पष्टपणे दिसून येणार आहे.
 परमेश्वराला मानवांची केलेली सेवा आवडते. सत्कृत्य करणारांवर तो प्रसन्न होतो. सदाचारी माणसावर त्याची बहाल मर्जी असते, मानवांच्या सुखदुःखाकडे दुर्लक्ष करून, फक्त परमेश्वराच्या नांवाचा कोरडा गजर करणाऱ्या दांभिकांकडे तो ढंकून देखील पहात नाही. मानवांना सदैव लाथाडणावा मस्तवाल लोकांनी, परमेश्वराच्या