पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

23



असा तोच एक आहे. उदारांतला उदार; दयासागर तोच एक. त्याच्याखेरीज दुसरा देव नाही. तो बादशहा आहे, तो पवित्र आहे: शांतीचा तो अधिपती आहे. अभय देणारा, रक्षण करणारा, सर्वांचा पोशिंदा, सर्वशक्तिमान् , नुकसान भरून देणारा आणि सर्व अत्युच्च सद्गुणांचा कळस असा तो एकच आहे. तोच एक श्रेष्ठ, सृष्टि-निर्माणकर्ता, सर्वांचा कर्ता असा तो आहे. अत्यंत आल्हादकारक, अशी त्याची नावे आहेत. स्वर्गात्, पृथ्वीवर असणारे यच्चयावत त्याची कीर्ति गात असतात. बलवानांतला बलवान, ज्ञान्यांचा ज्ञानी असा तो एकच आहे. त्याला सर्व ऐकं येते,. त्याला सर्व दिसते. तो कोणत्याही दुःखांतून मुक्त करणारा आहे. तो अत्यंत उदार व क्षमाशील असून जे सत्कृत्य करतात व पापापासून अलिप्त राहतात अशा सज्जनांच्या अगदी हातानजीक आहे."
 इस्लाममधील परमेश्वर किती प्रेमळ आहे याचा सुंदर दृष्टांत हजरत मुहम्मद पैगंबरांनी दिला आहे. एकदा एका गृहस्थाने पक्षाची पिल्लें धरून आणली होती. हजरत पैगंबरांनी त्या पिल्लांना त्यांच्या आईजवळ सोडतांच, तिने त्यांना प्रेमाने आपल्या पंखांखाली घेतले. त्या प्रसंगी हजरत पैगंबर म्हणाले, " आपल्या पिल्लांवर आईचे जितकें प्रेम आहे त्यापेक्षा जास्त प्रेम परमेश्वराचे आपल्या भक्तांवर आहे."
 इस्लाम धर्मातील एकेश्वरवादानें नुसत्या अरबस्तानांतच नव्हे तर साऱ्या जगामध्ये क्रांती करून टाकली आहे. अनेक देवांच्या कल्पनेमळे तझा देव श्रेष्ठ, माझा देव श्रेष्ठ अशी चाललेली लठ्ठालठी बंद झाली, देवांना प्रसन्न करण्याकरितां धार्मिक विधींचे अवडंबर माजवून, स्वतः मदोन्मत्त झालेल्या पुरोहित वर्गाचा नक्षा उतरला