पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ३ रे
इस्लाम आणि धर्मशास्त्र



 " इस्लाम हा दया, औदार्य आणि बंधुतेच्या भावनांनी ओतप्रोत भरलेला असून तो साधा ब सर्वांना सहज समजणारा धर्म आहे."

-एच्. जी. वेल्स.

 जगातील अनेक धर्मांना, त्या त्या धर्मसंस्थापकांचे किंवा ज्या जमातींत तो धर्म प्रसरत झाला त्या जमातीचें नांव देण्यांत आले आहे. ख्रिस्ती धर्म हे नांव त्या धर्माचा संस्थापक खिस्त याच्यापासून मिळालेले आहे. बुद्धानें प्रस्थापित केलेल्या धर्मास 'बुद्धधर्म' अशी संज्ञा आहे. ज्यू लोकांच्या धर्मास ज्यूडाइझम' हे नांव आहे. त्या धर्माचा संस्थापक जूडा नामक जमातीमधील होता म्हणून त्या धर्मास वरील नांव देण्यांत आले. इस्लाम या नांवाशी कोणत्याही व्यक्तीच्या किंवाए-22जमातीच्या नांवाचा संबंध येत नाही. इस्लाम हा कोणत्याही एका विवक्षित राष्ट्राचा किंवा जमातीचा धर्म नाही. परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून सदाचाराने वागणाऱ्या व मानवतेची सेवा करणाऱ्या अशा सर्वांचा हा धर्म आहे. इस्लाम हा शब्द अर्थपूर्ण आहे. शब्दशः त्याचा अर्थ स्नेहत्व असा होतो. त्याचा दुसरा अर्थ स्नेहसंपादन करण्याचा मार्ग असा आहे. त्याचा रूढार्थ परमेश्वरास


† Outline of History, Page 607.
२१