पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लामचा प्रसार

१९



अंमल सुरू झाला तेव्हांपासून अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ( म्हणजे सहाशे वर्षे ) त्यांचा अम्मल चालू होता."
 तेराव्या शतकाच्या सुमारास चीन, सैबिरीया व दक्षिण रशियामध्ये मुस्लिमांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. चीनमध्ये तर मुस्लिम राज्यकर्त्यांची कारकीर्द उल्लेखनीय अशीच झाली. चीनमधील अठरा प्रांतांत मुस्लिम लोकसंख्या अंदाजे दहा कोट होईल इतकी आहे. विशेषतः पश्चिम प्रांतांत ते बहुसंख्याक आहेत. त्याच शतकांत तुकांनी बाल्कन टापू व्यापून टाकला. तुकांच्या पहिल्या सुलतानाचें नांव : उस्मान ' असल्यामुळे तुर्की साम्राज्यास उस्मानी किंवा इंग्रजीमध्ये ओटोमन साम्राज्य या नावाने ओळखण्यांत येते. तुकांनी इ. स. १४५३ मध्ये कॉन्स्टॅटिनोपल सर केलें; इ. स. १५२१ साली बेलग्रेड घेतले आणि ऑस्टियाच्या राजधानीसव्हियेनास-वेढा घातला. पोलंडच्या राजाने तीव्र प्रतिकार केल्यामुळे व्हियेना त्यांच्या तावडीतून वांचलें.
 पंधराव्या शतकांत जावा, बोर्नियोमध्ये मुस्लिमांनी प्रवेश केला. आज इंडोनिशियामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या पांच कोटी आहे. जावापासन फिलिपाईन्स बेटापर्यंत मुस्लिम बहुसंख्याक आहेत. सोळाव्या शतकांत उत्तर सुमात्रामध्ये मुस्लिम राज्यकर्ते होते. इब्न बतता या सुप्रसिद्ध मुस्लिम प्रबाशाने चीन व मलायामधील वसाहतींचें साग्र व मनोरंजक वर्णन केले आहे.

 आफ्रिका खंड व्यापण्यास मुस्लिमांनी सातव्या शतकांतच


+ प्रो. ओतूरकरकृत " हिंदुस्थानांतील मुसलमानांचे साम्राज्य " पृ. २३.