पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
इस्लाम आणि संस्कृति




भाई मानवेंद्र रॉय लिहितात, " हे लष्करी विजय पुढील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्याचा प्रारंभच होत. त्यांच्यामुळे आर्थिक उन्नति व आध्यात्मिक प्रगति घडवून आणणारे राजकीय वातावरण निर्मिलें गेलें. रोमन व इराणी साम्राज्याचे अवशेष नाहीसे करणे अवश्य होते तरच नवीन कल्पना व ध्येये यांनी निबद्ध अशी नवी साम्राज्यघटना तयार होणे शक्य होते. दुष्ट रूढींनी व जादूटोण्याच्या गूढवादाने सर्व वातावरण गढळून टाकले होते व त्यामुळे पर्शियन आणि बायझंटाईन साम्राज्यांतील प्रजेचा आध्यात्मिक, बौद्धिक व नैतिक विकास अगदीच खुंटून गेला होता. मुहम्मदाच्या एकेश्वरीवादाच्या तलवारीने अरबी टोळ्यांमधील दांभिक मूर्तिपूजेचा नायनाट केला, झोरॉअस्टरच्या चिरंतन अशा दुष्ट तत्त्वज्ञानापासून मानवाला मुक्त केलें, ख्रिश्चन धर्माच्या चमत्कारपूर्ण रूढीच्या चिखलातून त्यांचा उद्धार केला आणि हिंदुस्थानला संन्यासवादाचा लागलेला रोग पूर्णपणे बरा करण्याचे कामी वरील हत्यार अत्यंत उपयुक्त ठरलें. अरबांच्या सर्व विजयांच्या योगाने नवा इतिहासच घडविला गेला आहे. मानवी समाजाला प्रगत केले आहे."

 मुस्लिमांच्या विजयाची परंपरा १६ व्या शतकापर्यंत अखंड चालू होती. हिंदुस्थान, चीन, रशिया, तुर्कस्थान, जावा, सुमात्रा इतक्या ठिकाणी मुस्लिमांनी आपले निशाण फडकावले. हिंदुस्थानवर सातव्या शतकापासून मुस्लिमांच्या स्वाऱ्या चाल होत्या. बाराव्या शतकाच्या सुमारास त्यांनी हिंदुस्थानांत स्थाईक होण्याचा पायंडा घातला. “ इसवी सन १२०५ पासून दिल्लीच्या तक्तावर मुस्लिमांचा


+ Historical Roll of Islam, Page 10-11.