पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लामचा प्रसार

१७


म्हणतो," त्याने ब्राह्मण सत्ताधारी वर्गाला विश्वासांत घेऊन, देशांत शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविले. त्यांची देवळे सुस्थितीत ठेवण्याची परवानगी दिली, त्यांना आपल्या धर्माप्रमाणे वागण्यास कधीही हरकत केली नाही, वसल त्यांचेच हाती ठेवला, इतकेच नव्हे तर पूर्वीची राज्यव्यवस्था चालं ठेवण्यासाठी त्यांचीच योजना केली.” मोंगल रियासतींत तर मोठमोठ्या जबाबदारीच्या हुद्यांवर हिंदूंची नेमणूक करण्यांत येई. हिंदुस्थानांत ठिकठिकाणी विखुरलेल्या निरनिराळ्या मुस्लिम राजवटींत मुख्य प्रधान-पदावर मुस्लिमेतरांना नेमण्यांत आल्याचे दाखले आहेत. विशेषतः ज्या औरंगजेब बादशाहाविषयी प्रखर टीका केली जाते त्या बादशाहांनी आपल्या साम्राज्याचे मुख्य प्रधान म्हणन पंडित रघुनाथ खत्री व मुख्य सेनापति म्हणून जयसिंग यांची नेमणक केलो होती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण सोईस्करपणे विसरता कामा नये.
 परधर्मीय नागरिकांना सुसंस्कृत करण्याकरितां, मुस्लिम जेत्यांनी जे परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे ऋण कधीही विसरले जाणे शक्य नाही. ठिकठिकाणी त्यांनी महाविद्यालये व शिक्षणकेंद्रे प्रस्थापित। केली; विद्वानांचा गौरव केला; समृद्ध साहित्य व तत्त्वज्ञान निर्माण केले. डॉ. डेपर लिहितो, " मुस्लिमांनी जितक्या वेगानें रोमन साम्राज्य हस्तगत केलें तितक्याच वेगाने तत्त्वज्ञान ब साहित्य यांवर र प्रभत्व मिळविले.

 लटमार, कत्तल व अनाचार यांचा अवलंब न करतां, मुस्लिमांच्या लष्करी विजयांनी संस्कृतीचा रम्य प्रांत निर्माण केला आहे.


* History of the Conflict between Religion & Science;
Page 106.


इ.सं.२