पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६

इस्लाम आणि संस्कृति



ते ज्या ठिकाणी जेते म्हणून गेले, त्या ठिकाणी त्यांनी तेथील जनतेला संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य व धर्मस्वातंत्र्य दिले इतकेच नव्हे तिला सुसंस्कृत करण्याची थोर वृत्ति त्यांनी दाखविली आहे. इस्लाममध्ये समता कसोशीने पाळण्यात येत असल्यामुळे दलितांना तर अरब जेते आपले उद्धारकर्ते वाटत. रेनौडॉट लिहितो, "इजिप्तमधील मुस्लिम मॅजिस्ट्रेट हे धर्मगुरु, कुलपति इत्यादि सर्व लोकांचे हक्क, दर्जा व अंतर्गत कारभाराचे स्वातंत्र्य पूर्णपणे रक्षीत असत. कित्येकांना शहर अगर प्रांताधिकारी बनवून त्यांचा गुणगौरव केला जात असे. एका खलिफानें इराणचे राज्ययंत्र चालविण्यास खिश्चन लोक विश्वासार्ह आहेत असे घोषित केले होते."

 परधर्मीय प्रजाजनांना विश्वासांत घेऊन, त्यांच्याशी समरस होण्याची कला मुस्लिम जेत्यांनी साध्य केली होती. आपल्याशी त इमानाने वागतील का, आपल्या विरुद्ध कांहीं कारस्थान तर त करणार नाहीत, अशा शंका मनात बाळगून त्यांची निष्ठा कसाला लावण्याचा हास्यास्पद उद्योग न करितां, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा दिलदारपणा ते प्रदर्शित करीत. या आत्मीयतेमळे प्रजाजनांना त्यांच्याशी बेइमान व्हावे असे कधीच वाटले नाही. मनुष्य विश्वासाची किंवा उदारवत्तीची फेड सहसा कृतघ्नतेने करीत नाही हे मुस्लिमांनी पूर्णपणे ओळखले होते. परधर्मीय प्रजाजनांवर मुस्लिमांनी संपूर्ण विश्वास टाकल्याची अनेक उदाहरणे इतिहासांत जागोजाग आढळून येतील. हिंदुस्थानावर पहिली स्वारी करणारा मुहम्मद इब्न कासीन हा हिंदुस्थानी वातावरणास सर्वस्वी अपरिचित होता. त्याच्या विषयीं इलियट आपल्या "हिंदुस्थानचा इतिहास"ग्रंथांत


+ Historical Roll of Islam Page, 46.