पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

 " यापुढें जगाचा जो एकच एक मानवधर्म होणार आहे, त्याचीं तत्त्वें पंधरा वर्षांपूर्वी प्रतिपादन करणाऱ्या विभूतीचें चरित्र आबालवृद्ध मराठी वाचकांपुढे ठेवून तुम्हीं त्यांची चांगली सेवा केली आहे यांत शंका नाहीं."

- वि. स. खांडेकर


 ग्रंथकाराने अत्यंत परिश्रम घेऊन विषयाची मांडणी इतकी स्पष्ट व आकर्षक केली आहे कीं चरित्र वाचतांना मनास अत्यंत आल्हाद वाटतो."

- शेख अबदुल अजीझ, एम. एस्सी. (लंडन)


"सुरुवातीपासून अखेरपर्यंत सुंदर व सुबक मराठी भाषेत चरित्र लिहिलें आहे. लेखनशैली अतिशय उत्कृष्ट आहे."

- डॉ. अबदुल हमीद काझी, एम्. ए., पीएच. डी. (बलीन)


 “ मोठ्या आवडीनें व काळजीपूर्वक पुस्तक वाचलें; अतिशय आनंद झाला. इस्लामंधर्म म्हणजे काय आहे याची यथायोग्य कल्पना येण्यास अशा पुस्तकांची अत्यंत जरूरी आहे. "

- खानबहादूर बदिउझ्झमान काझी, एम्. ए.


 " चरित्रामधील अत्यंत महत्त्वाची प्रकरणे इतक्या बुद्धिमत्तेनें व कुशल- तेनें रेखाटली आहेत कीं ग्रंथकाराविषयीं धन्योद्गार बाहेर पडतात."

- मौलाना इनायत उल्ला, लखनौ युनिव्हर्सिटी

 "विद्वान् व सहृदय ग्रंथकार गि. अमीन यांनी आशिया खंडांतील एका थोर तत्त्वज्ञानी सत्पुरुषाचें लिहेिलेलें हैं चरित्र छोटेसें पण आल्हाद- कारक आहे."

- मॉडर्न रिव्ह्यू, कलकत्ता


 "सय्यद अमीन यांनीं पैगंबरांचे चरित्र व शिकवण उज्ज्वल स्वरुपांत आणि सुंदर मराठीत मांडले आहे.